Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भडगाव येथील प्रहार दिव्यांग संघटनेचे उपोषण सुटले

भडगाव येथील प्रहार  दिव्यांग संघटनेचे   उपोषण सुटले.
—  दिव्यांग उमेदवारांचे ५ ते ६ महिन्यापासुन मानधन थकीत आहे. पोर्टल बंद बाबत उत्तरे मिळतात. तसेच अंत्योदय योजनेत दिव्यांग बांधवांना समाविष्ट केले जात नाही. या मागण्यांबाबत भडगाव प्रहार दिव्यांग क्रांती संघटना मार्फत दि. १ रोजी सकाळी ११ वाजेपासुन भडगाव तहसिल कार्यालयासमोर उपोषणास सुरुवात करण्यात आलेली होती. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांसह दिव्यांग बांधव, महिला आदिंची मोठया संख्येने उपस्थिती होती. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्यांनी मागण्यांबाबत घोषणा केल्या.  संघटनेमार्फत यापुर्वीच उपोषणास  बसण्याबाबत  ईशाराचे निवेदन भडगाव तहसिलदार शितल सोलाट यांना दिलेले आहे. 
 उपोषणस्थळी संगायो योजना तहसिलदार रमेश देवकर यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्याने दि. १ रोजी दुपारी हे उपोषण सोडण्यात आले.
 . तालुक्यातील अंतर्गत पाञ दिव्यांग बांधवांनी कागदपञाची पुर्तता करुन देखील बर्याचशा दिव्यांग बांधवांना ५ ते ६ महिन्यापासुन संजय गांधी योजनेचे मानधन मिळालेले नाही.ते तहसिल कार्यालय येथे सतत चकरा मारत राहतात. त्यांना एकच उत्तर मिळते कि पोर्टल बंद आहे. परंतु प्रशासकीय स्तरावर अध्याप पोर्टल बाबत कोणताच पाठपुरावा झालेला नाही.
तसेच अंत्योदय रेशन कार्ड बाबत पुरवठा शाखेत दिव्यांग बांधवांनी कागदपञाची पुर्तता करुन देखील तालुक्यासह शहरातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेत समाविष्ट केलेले दिसुन येत नाही. तसे बघीतले तर शासनाचे तसे परीपञक आहे.परंतु त्याची अंमलबजावणी होतांना दिसुन येत नाही. .
 उपोषणास बसलेले
 दिपक पाटील जिल्हाध्यक्ष, 
चंद्रशेखर सिंहले, जिल्हा उपाध्यक्ष 
धर्मराज पाटील, जिल्हा सचिव
राजु परदेशी ज्येष्ठ सल्लागार ,
करतारसिंग रामसिंग परदेशी तालुकाध्यक्ष ,
रत्‍नाबाई निकम महिला आघाडी तालुकाध्यक्ष,
भरत धोबी तालुका 
 सल्लागार ,
भारत पाटील तालुका उपाध्यक्ष ,
संजय कोळी शहराध्यक्ष ,
गजानन तांबटकर कार्याध्यक्ष ,
निलेश पाटील तालुका संपर्कप्रमुख ,
रवी पाटील पाचोरा तालुका अध्यक्ष ,
अविनाश मराठे पारोळा तालुका अध्यक्ष ,
आनंदा पाटील, राजेंद्र पाटील. चंदू महाजन ,
भावडू सावंत, भगवान पाटील यांचेसह दिव्यांग बांधव, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.
दिव्य महाराष्ट्र न्यूज साठी सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.