प्रभावी युक्तिवादाने दुकानदारांना दिलासा
[सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी ]
भडगाव तालुक्यातील कजगाव बस स्टँड परिसरामधील 35 ते 40 दुकानदारांना हटवण्यासाठी अनेकदा आत्मदहन तसेच विविध तक्रार करण्यात आल्या होत्या.
या अनुषंगाने ग्रामपंचायत व इतर कार्यालया मार्फत या दुकानदारांना दि. 13/12/2024 शुक्रवार रोजी नोटीसा बजावण्यात आल्या होत्या या कार्यवाही नोटीसा विरोधात दुकानदाराच्या वतीने भडगाव येथील दिवाणी न्यायालयात दिनांक 17/12/2024 मंगळवार रोजी ॲड. रणजित राजेंद्र पाटील च्या मार्फत दावा हा दाखल करण्यात आला होता.
सदर दाव्यात ॲड. रणजित राजेंद्र पाटील यांनी प्रभावी युक्तिवाद केला असता न्यायाधीश एस.व्ही.मोरे यांनी दिनांक 19/12/2024 गुरुवार रोजी बस स्टँड परिसरातील दुकानदारांना तात्पुरता दिलासा देत परिस्थिती "जैसे थे" ठेवण्याबाबत आदेश ग्रामपंचायत कजगाव यांना दिले आहेत.
सदर दुकानदारांच्या वतीने दावा दाखल करण्याचे काम ॲड. रणजित राजेंद्र पाटील कनाशीकर यांनी पाहिले.