Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोर युवा फाउंडेशन 55 शिक्षकांचा सन्मान करणार

सामाजिक कार्यात अग्रेसर थोर सन्मित्र युवा फाउंडेशनकडून 55 शिक्षकांचा सन्मान
शिक्षक दिनानिमित्त भव्य सत्कार समारंभ; शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन होणार गौरव

थोरगव्हाण प्रतिनिधी : 
सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर भूमिका बजावणाऱ्या थोर सन्मित्र युवा फाउंडेशन, थोरगव्हाण यांच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त ५० शिक्षकांच्या सत्काराचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून शनिवार, ५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक ९.४५ वाजता डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे भव्य शिक्षक सत्कार समारंभ २०२६ आयोजित करण्यात आला आहे.
या समारंभात डी. एस. देशमुख विद्यालयातील कार्यरत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच थोरगव्हाण केंद्रातील जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक यांचा सन्मान करण्यात येणार आहे. या उपक्रमात एकूण 55 शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार असून, त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान
शिक्षकांच्या कार्याचा गौरव करताना प्रत्येक शिक्षकाचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात येणार आहे. ज्ञानदानाच्या माध्यमातून अनेक पिढ्यांना घडविणाऱ्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याची ही विशेष संधी असून, या उपक्रमातून शिक्षकांना सन्मानाची पावती मिळणार आहे.
शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाला दिशा देणारा आणि समाजाच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक आहे. ज्ञानदानासोबतच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक जाणीव, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जीवनमूल्ये रुजविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात. त्यामुळे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी फाउंडेशनने हा उपक्रम हाती घेतला आहे.
पदाधिकाऱ्यांसह सर्व सदस्यांचे उत्कृष्ट नियोजन
या कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यासाठी फाउंडेशनचे अध्यक्ष उमाकांत वसंत बावस्कर, खजिनदार युवराज (विलास) माधव चौधरी, सचिव योगेश भागवत झोपे यांच्यासह फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत असून, कार्यक्रमाच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात येत आहे.
सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या थोर सन्मित्र युवा फाउंडेशनच्या सामाजिक कार्यातील हा आणखी एक महत्त्वपूर्ण उपक्रम मानला जात आहे. शिक्षकांप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जाणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.