Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगांव जवळ लवकी च्या नाल्यात पडून फॅक्टरी कर्मचारी शुभमचा मृत्यु

 वरणगांव फॅक्टरी कर्मचाऱ्याचा लवकी नाल्यात बुडून मृत्यू 


वरणगांव येथील आयुध  निर्माणी मधील कर्मचारी शुभम बबलू तायडे वय २३  याचा वरणगांव व फॅक्टरी रोडवर असलेल्या लउकी नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे 
याबाबत पोलीस सुत्राकडून  मिळालेल्या माहितीनुसार शुभम बबलू तायडे हा फॅक्टरी मध्ये दरबान पदावर नोकरीवर असून तो भुसावळ मध्ये राहतो
 सकाळी सात वाजता तो ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाला असता लवुकीच्या नाल्याला पूर असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने त्यात तो त्यात तो पडला असावा असा पोलिसांचा कयास आहे . वरणगाव येथील मयूर जावळे यांनी दुपारी १२ वाजता  दूरध्वनी द्वारे  इंटकचे महासचिव महेश पाटील यांना कळवले की लवकी नाल्यात फॅक्टरीचे स्टिकर लावलेली मोटरसायकल पडलेली आहे त्यावेळी महेश पाटील यांनी समक्ष जाऊन बघितले असता सदरची मोटरसायकल ही शुभम तायडे ची असल्याचे त्यांच्या लक्षात आले 
नाल्याच्या किनाऱ्यावर १०० मीटर अंतरावर शोध घेतल्यानंतर शुभम तायडे हा झाड झुडपांमध्ये मयत अवस्थेत आढळून आला आहे 
यावेळी महेश पाटील यांनी वरणगांव पोलीस स्टेशनला खबर दिली  वरणगाव पोलीस स्टेशनचे स्टाफ त्या ठिकाणी पोहचले
 त्यांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पोहोचवला असून या प्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू क्र ३३ /२३ सीआरपीसी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे अधिक तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय परशुराम दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टाफ करीत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.