Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वरणगाव नजिक राष्ट्रीय महामार्गावर अपघातात ४८ वर्षीय भुसावळचा व्यक्ती जागीच ठार



वरणगाव नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अज्ञात वाहनाच्या धडकेत भुसावळ येथील बाजार वार्ड . मधील रहिवाशी ललीत प्रभाकर नेमाडे वय 48 हे जागीच ठार झाले आहे .ही घटना फुलगाव उड्डाणपुलाजवळ शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारात घडली .
ललीत नेमाडे मुक्ताईनगर कडून भुसावळ कडे पत्नी सोबत मोटरसायकल क्रमांक एम एच १९ डी एस .३३५६ भुसावळ कडे जात असताना अचानक उड्डाणपूला जवळ मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने  मोटर सायकल डीव्हायडर वर आपटल्याने नेमाडे यांचा जागीच मृत्यू झाला आहे . अपघातात त्यांची पत्नी निता जखमी झाली असून त्यांना वरणगाव येथील ग्रामिण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे सदर दांम्पत्य हे हरताळा येथुन  देवदर्शन करून परत येत असल्याची माहीती मिळत असुन मयत ललित हे भुसावळ येथील नव महाराष्ट्र स्टोअर्सचे संचालक होते . भुसावळचे नगरसेवक उमेश नेमाडे . यांनी घटना स्थळी भेट दिली आहे . घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस स्टेशन कर्मचारी घटनास्थळी पोहचले त्यांनी मृतदेह वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पोहचविला आहे .
 घटनेचा अधिक तपास पीएसआय परशुराम दळवी व स्टाप करीत आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.