*वरणगाव चे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या कडून प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे यांचा सत्कार व समस्यांचे दिले निवेदन*
वरणगाव चे लोक नियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे व टीम आज आपल्या एमएच १९ cw ०९०९ ही गाडी आज भुसावळ नगर परिषदेत दुपारी तीन वाजता इंट्री झाली लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे हे आपल्या सहकार्या सोबत भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष सौ शैलजा नारखेडे यांच्या दालनात गेले आणि शैलेजा नारखेडे यांचा श्री रामाची शाल पांघरून सत्कार केला आणि आपल्या भुसावळ शहरातील वरणगाव रोड ची अस्वस्था अत्यंत खराब झाली आहे .
वरणगाव करांना रिक्षा चालक तसेच प्रवाशांना प्रवास करतांना पडलेल्या गड्डा मूळे भरपूर त्रास होत आहे अपघात होत आहे गड्डे बुजवून रस्ता तयार करा तसेच दुभाजक मधील व दोन्ही बाजूचे काटेरी झुडपे काढण्यात यावे शिवाजी नगर ते पंधरा बंगला दरम्यान असलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा जुने बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात यावे तसेच भुसावळ जिल्हा होण्यासाठी ठराव मंजूर करावा अशी मागणी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांच्या शी चर्चा करताना केली