सुमित बऱ्हाटे यांची अ.भा. लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड
भुसावळ प्रतिनिधी
येथील सुहर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष सुमित राजेंद्र बऱ्हाटे यांची अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.
समाजासाठी राजकारणविरहित व सेवाभावी पद्धतीने कार्य करून समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, युवा वर्ग तसेच इतर नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.
सुमित बऱ्हाटे यांच्या निवडीमुळे अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाच्या माध्यमातून समाजहिताचे अधिकाधिक उपक्रम राबविण्यास चालना मिळणार असून, संघटनेचे कार्य अधिक बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
ही नियुक्ती अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रकाश पाटील व प्रदीप भोळे यांनी केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल समाजबांधवांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.