थोरगव्हाण येथीला एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे माजी शालेय समिती सदस्य तथा विविध कार्यकारी सेवा सोसायटी, थोरगव्हाणचे अध्यक्ष मधुकर वसंत कोल्हे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर आणि संचालक नंदकुमार एकनाथराव चौधरी, चंद्रकांत सुराजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी विद्यार्थ्याना कॉपी मुक्त अभियान कॉपीमुक्तीची शपथ दिली. ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांकडून नशामुक्तीची सामूहिक शपथ घेतली. विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतगायन तसेच सामूहिक देशभक्तीपर नृत्य सादर करून वातावरणात देशप्रेमाची ऊर्जा निर्माण केली. यावेळी मधुकर कोल्हे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन प्रोत्साहन करण्यात आले.
कार्यक्रमात एस. बी. सपकाळे, के. एम. पाटील व जे. ए. चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ध्वजस्तंभाभोवती आकर्षक रांगोळी साकारण्यात आली दर्शनी प्रभावी फलक लेखन कलाशिक्षक एस बी सपकाळे यांनी केले क्रीडा शिक्षक यांचे नेतृत्वात ध्वजवंदन आणि स्काऊट गाईड विद्यार्थी शिस्तबद्ध पथसंचालनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक जितेंद्र आत्माराम चौधरी यांनी केले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशभक्तीचा जागर, नशामुक्तीचा निर्धार आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने विद्यालयाचा स्वातंत्र्यदिन सोहळा अविस्मरणीय ठरला. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत ‘भारत माता की जय’च्या जयघोषात कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण समारोप करण्यात आला.