Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बांबरुड गावचे सुपुत्र रविंद्र सिंग परदेशी यांना भारत सरकार चे उत्कृष्ठ सेवा पदक प्रदान

*बांबरुड गावातील सुपुत्र रवींद्र सिंग परदेशी यांना भारत सरकारचे उत्कृष्ट सेवा पदक... 
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
गोंडगाव तालुका भडगाव जवळील जीवाभावाचे गाव बांबरुड येथील सुपुत्र तथा राज्य राखीव पोलीस दल पुणे येथील कमांडर श्री, रवींद्र सिंग संतोष सिंग परदेशी यांना त्यांच्या निष्कलंक, शिस्तबद्ध, उल्लेखनीय सेवेसाठी भारत सरकारतर्फे उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय सन्मानामुळे बांबरुड सह परिसरात तथा भडगाव तालुक्या आणि जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शिरपेचात एक मानाचा तुरा तथा उत्कृष्ट काम कामगिरीबद्दल जिल्ह्यात तथा तालुक्यात परिसराचे नाव रोशन झाले आहे, 
बांबरुड गावाचे शेतकरी पुत्र म्हणून ओळखले जाणारे श्री, रवींद्र सिंग परदेशी हे श्री, संतोष सिंग भुरेसिंग परदेशी  व जिजाई संतोष सिंग परदेशी यांचे सुपुत्र आहेत, शिस्तप्रियता, कर्तव्यनिष्ठता, आणि कार्यातील प्रामाणिकपणा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची अनोखा ओळख असल्याचे कळते, अधिकारी म्हणून कठोर शिस्तीचा आग्रह राखतानाच आपल्या सहकार्याची आणि कर्मचाऱ्यांची जिव्हाळ्याने काळजी घेणारा एक ग्रामीण भागातील व शेतकरी पुत्र पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये अधिकारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे, 
आपल्या सेवेत तळागाळातील नागरिकांना मदतीचा हात देणे, जनतेशी संवेदनशीलतेने संवाद राखणे  आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारात्मक समाज व राष्ट्रसेवा करण्याची भावना जोपासणे ह्या त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू मानला गेला आहे, कर्तव्य बजवताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि मानवी संवेदना यांच्या समतोल साधण्याचा त्यांच्या कार्याची भारत सरकारने त्वरित दखल घेऊन हा संपूर्ण परिवारासाठी त्यांच्या गाव परिसरात साठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे, संपूर्ण भडगाव तालुका व बांबरुड परिसरात अभिनंदन  मोलाच्या शुभेच्छा दिल्या जात आहे,

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.