आपल्या देशात मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड, वन व जंगल क्षेत्रात होत असलेली घट त्यामुळे हरित क्षेत्र कमी झाल्याने त्याचा परिणाम पर्यावरणावर होत वातावरण प्रदूषित झाल्याने आपणास ढगफुटी सदृश्य पाऊस,चक्रीवादळे,भूकंप, दुर्धर आजार अशा अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. आपल्या सहित निसर्गनिर्मित सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तरी आपला देश हरित भारत, समृद्ध भारत, प्रदूषण मुक्त भारत होण्याच्या दृष्टीने आपले आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून ॔॔॔एक पेड माँ के नाम ॓॓॓ ॓ या अभियानांतर्गत दरवर्षी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होत असून यंदाही वनविभाग, सामाजिक वनीकरण विभाग यांचे तर्फे वृक्ष लागवडीसाठी 30 सप्टेंबर पर्यंत मोठ्या प्रमाणात शाळा, महाविद्यालय,स्थानिक स्वराज्य संस्था, सरकारी कार्यालय यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची रोप नाममात्र दरात उपलब्ध केलेली आहे. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये आपणास निरोगी जीवन जगण्यासाठी झाडे असणे अतिआवश्यक असून वृक्षलागवडीबरोबर संगोपन, संरक्षण याची आवड व महत्व निर्माण होण्यासाठी शासनामार्फत शालेयस्तरावर विद्यार्थ्यांकडून प्रार्थनेबरोबर वृक्ष प्रतिज्ञेचा समावेश केल्यास झाडांविषयी प्रचंड आदर निर्माण होत ॔॔॔एक पेड माँ के नाम ॓॓॓॓॓॓ ॓अंतर्गत मोठ्या प्रमाणात संगोपन व संरक्षणासहित वृक्षारोपण होण्यास मदत होईल . तसेच इतरही ठिकाणी सामुदायिक वृक्षारोपण करताना वृक्ष प्रतिज्ञा घेतल्यास संरक्षण व संगोपनास मोठ्या प्रमाणात मदत होईल.डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र
शालेय स्तरावर प्रार्थने सोबत वृक्ष लागवड संगोपन प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना दिल्यास पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत . डॉ सुरेंद्रसिंग पाटील
August 05, 2026
0
*वृक्षलागवडीबरोबर वृक्षाचे संरक्षण व संगोपन गरजेचे,, शालेयस्तरावर प्रार्थनेबरोबर वृक्षप्रतिज्ञेचा समावेश केल्यास विद्यार्थ्यांमध्ये वृक्षाविषयी आदर निर्माण होईल. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील.