Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात आ नंदकिशोर महाजन यांचा सत्कार व शिष्यवृत्ती धनादेश वितरण

देशमुख विद्यालय, थोरगव्हाण येथे शिष्यवृत्ती वाटप व आमदार नंदकिशोर महाजन यांचा जाहीर सत्कार
सुवर्ण जयंती महोत्सवांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशांचे वितरण; १०९ वर्षांची सुजाण नागरिक घडविण्याची परंपरा अधोरेखित


थोरगव्हाण (ता. रावेर) : दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे गुरुवार, दि. ३० जुलै रोजी सुवर्ण जयंती महोत्सवांतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश (चेक) वितरण तसेच विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार मा. नंदकिशोरभाऊ महाजन यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिभाताई शिंदे या होत्या. अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, "शेती आणि मातीतील ज्ञानानेच माणूस मोठा होतो. मातीतील शिक्षण कोणीही चोरून घेऊ शकत नाही. सुजाण नागरिक घडविण्याची प्रक्रिया डी. एस. देशमुख विद्यालय गेल्या १०९ वर्षांपासून सातत्याने राबवत आहे."
यावेळी विविध संस्था, पदाधिकारी व पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने आमदार नंदकिशोरभाऊ महाजन यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी जनतेची सेवा, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि लोकहिताच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष प्रतिभाताई शिंदे यांच्या शुभहस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी केले, तर आमदार नंदकिशोर महाजन यांच्या कार्याचा परिचय एम. के. पाटील यांनी करून दिला.
संस्थेचे सचिव पवन हेमंतराव चौधरी यांनी उपस्थित मान्यवर, पालक व पाहुण्यांचे स्वागत करून संस्थेचा गौरवशाली इतिहास आणि संस्थेचे नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम उपस्थितांसमोर मांडले.
प्रतिभाताई शिंदे व आमदार नंदकिशोर महाजन यांच्या हस्ते शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरित करण्यात आले.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन चौधरी, संचालक गोविंद चौधरी, नंदकुमार चौधरी, मधुकर कोल्हे, दिनेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच सेवानिवृत्त पोलीस पाटील अरविंद झोपे यांचा  सत्कार संस्थेचे संचालक रवींद्र चौधरी यांनी केला
अंगणवाडीच्या शकुंतला पाटील यांचा सत्कार जयश्री चौधरी यांनी केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सचिन नंदकुमार चौधरी, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले. सचिन चौधरी यांच्या वतीने अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली. व्यवस्थापन समिती सदस्य, ग्रामस्थ व पालकांनी ज्येष्ठ शिक्षक वायं जे कुरकुरे यांचे सह सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.