Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वडगाव येथील फार्मर कप स्पर्धे अंतर्गत शेतकरी गटाला कृषी अधिकारी यांची भेट

मौजे वडगाव तालुका रावेर येथे आज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री कुरबान तडवी यांनी प्रक्षेत्र भेटीच्या दरम्यान पाणी फाउंडेशन, उमेद अभियान तसेच कृषी विभाग यांच्या माध्यमातून सुरू असलेली फार्मर कप स्पर्धे मध्ये सहभागी असलेले बळीराजा शेतकरी गटाला भेट दिली. तसेच त्यांनी सलग उडीद पीक प्रात्यक्षिकाची पाहणी केली आणि त्या संदर्भामध्ये चिकटसापळे तसेच कामगंध सापळे, प्रकाश सापळे आणि पक्षी थांबे उभारण्यासाठी संबंधित शेतकरी बांधवांना सुचित केले.गटाने तयार केलेला निंबोळी अर्क आणि दशपर्णी अर्क सध्या ढगाळ वातावरणामुळे येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी वापर करावा अशी ही सुचना केली.
 सदर प्रक्षेत्र भेटीच्या दरम्यान श्री तडवी साहेब यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली व वातावरणाच्या बदलानुसार आपल्याला सध्या पीक फेरपालट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. सदर प्रसंगी गादीवाफ्यावर मक्याची लागवड केल्यामुळे त्याची झालेली जोमदार वाढ ही केवळ गादीवाफा आणि SOP चा अवलंब केल्याचा  परिपाक आहे असे मत व्यक्त केले.सदर सदर प्रक्षेत्र भेटीच्या दरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री. भाऊसाहेब वाळके, मंडळ कृषी अधिकारी श्री.अनिल महाजन, सत्यमेव जयते फार्मर कप चे कृषी विभागाचे मेंटॉर श्री सचिन गायकवाड,सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती प्रीती सरोदे तसेच वडगाव मधील शेतकरी श्री मनोहर नारायण पाटील तसेच इतर शेतकरी बांधव उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.