Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


पाचोरा येथील नर्मदा स्कूल मध्ये आषाढी एकादशी निमित्त कार्यक्रम संपन्न

*नर्मदा स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त भव्य दिंडी सोहळा; वारकरी संस्कृतीचा अनोखा संगम, चिमुकल्यांच्या भक्तिमय सादरीकरणाने जिंकली सर्वांची मने
पाचोरा : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त नर्मदा स्कूलमध्ये भक्ती, संस्कार आणि भारतीय परंपरेचा सुंदर संगम घडविणारा भव्य दिंडी व पूजन सोहळा उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर संपूर्णपणे विठ्ठलनामाच्या जयघोषाने आणि भक्तिरसाने भारावून गेला.
हा सोहळा नर्मदा स्कूलचे संस्थापक मा. श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. तसेच किशोर आप्पा बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा मा. सौ. सुनिताताई पाटील, श्री. सुमित दादा पाटील आणि श्री. प्रवीण आप्पा पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने झाली. मा. श्री. किशोर आप्पा पाटील व मा. सौ. सुनिताताई पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा व महाआरती करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी "पांडुरंग हरी, विठ्ठल विठ्ठल" या नामघोषात भक्तिभावाने सहभाग नोंदविला.
यानंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संगीत शिक्षक श्री. रितेश भोई यांच्या संकल्पनेतून विठ्ठल-रुक्मिणी दिंडी. या दिंडीत विद्यार्थ्यांनी विठोबा, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर महाराज, संत मीराबाई तसेच वारकरी यांच्या आकर्षक वेशभूषेत सहभाग घेतला.
यावेळी मा. किशोर आप्पा पाटील यांनी विद्यार्थ्यांसोबत दिंडीत सहभागी होत चिमुकल्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. आप्पासाहेबांनी विद्यार्थ्यांसह प्रसादाचा आनंद घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि अशा सांस्कृतिक व धार्मिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा, सामाजिक मूल्ये व भक्तीभाव जोपासला जात असल्याचे सांगितले.
या प्रसंगी शाळेच्या प्राचार्या राधिका प्रभू, उपप्रााचार्य श्री जॉन सर, प्रशासकीय अधिकारी श्री संतोष पाटील, जनसंपर्क अधिकारी श्री समाधान पवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.