दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
थोरगव्हाण, दि. ८ जुलै : दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज (दि. ८ जुलै २०२६) राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्वंकष आरोग्य तपासणी करण्यात आली.
या आरोग्य तपासणी शिबिरात ग्रामीण रुग्णालय, रावेर येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकातील डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश्वरी गजरे, श्री. जगदीश महाजन व सौ. रोहिणी ढाके यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. डी. के. पाटील तसेच ज्येष्ठ शिक्षक श्री. वाय. जे. कुरकुरे उपस्थित होते. आरोग्य तपासणी उपक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे दि एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाणचे सर्व पदाधिकारी व संचालक मंडळ यांनी कौतुक केले.ग्रामीण रुग्णालय, रावेर येथील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथकाचे वाजे कुरकुरे यांनी आभार मानले.