*वाडेहुन श्रीक्षेञ देहु ते श्रीक्षेञ पंढरपुर निघाली पायी वारी.
*१ हजार भाविक सहभागी.
वाडे तालुका भडगाव.
हनुमंत महाराज गोणारकर,. हभप. ज्ञानेश्वर महाराज ढगे दहिसर यांच्या दिंडी मालक श्री. हभप. पुरुषोत्तम पाटील रा. वाडे. ता. भडगाव यांच्या नेतृत्वाखाली यावर्षीही जगदगुरु* *तुकोबारायांच्या पालखी सोहळया बरोबर संतसेवक प्रासदिक दिंडी ( पायी वारी ) वाडेहुन श्रीक्षेञ देहु ते श्रीक्षेञ* *पंढरपुरला निघाली आहे. या पायी दिंडी (वारीला) भाविकांसह वाडे येथुन दि. ६ रोजी सोमवारी दुपारी २ वाजता प्रस्थान झालेले आहे. याच दिवशी सकाळी गावातुन टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांच्या* *उपस्थितीत प्रभातफेरी काढण्यात आली. या दिंडीत वाडे गावातुन ७० भाविक सहभागी झालेले आहेत.
ही दिंडी वाडे, चाळीसगाव, लासलगाव मार्गाने श्रीक्षेञ देहु ते श्रीक्षेञ पंढरपुर येथे पोहोचणार आहे. तर या दिंडीत जळगाव, नाशिक,* *आहिल्यानगर, धुळे, ठाणे, पुणे, मुंबई, नागपुर जिल्हयातील भाविक सहभागी होणार आहेत. ही दिंडी पुढे श्रीक्षेञ देहु ते श्रीक्षेञ पंढरपुर अशी निघणार आहे.
*. दि. २६ रोजी रविवारी ही दिंडी श्रीक्षेञ पंढरपुर येथे पोहचणार आहे.