भडगाव तालुक्यात दिनांक 3 व 4 जुलै रोजी कजगाव गोडंगाव वाडे बांबरुड कोठली कनाशी गुढे नावरे घुसर्डी सावदे गिरणा पट्ट्यात दमदार पावसाने हजेरी लावल्या शेतकऱ्याला वर्गाला दिलासा मिळाला असुन भडगाव तालुक्यात 66 मिली पावसाची नोंद झाली आहे गतवर्षी आत्तापर्यंत155 मि ली पावसाची नोंद आतापर्यंत झाले होती कापूस नगदी पीक असल्याने सर्वाधिक पेरा यावर्षी झाला असुन भडगाव तालुक्यातकापूस लागवडीचे उद्दिष्ट पंचवीस हजार आठशे वीस हेक्टर असून आतापर्यंत 16000 202 हेक्टर वर कापसाचीलागवड पूर्ण झाली आहे .
खरीप हंगामाचे एकूण उद्दिष्ट क्षेत्र 35 हजार 764 असून 17,693 हेक्टरवर पेरण्या पूर्ण झाल्या असून दमदार पावसाने पीक स्थिती उत्तम असून शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत नदी नाले ओसाडुन वाहत असल्याने पाणीटंचाईचे संकट हळूहळू कमी होणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे रासायनिक खतांच्या किमती वाढल्याने शेतकऱ्यात नाराजीचा सूर व्यक्त होत शासनाने रासायनिक खतावरील सबसिडी वाढवून किमती पूर्वजत करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे