सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
अडावद तालुका चोपडा
दि. ३० जून २०२६
प्राथमिक आरोग्य केंद्र-अडावद, ता.चोपडा येथे आरोग्य सहाय्यिका या पदावर दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर सौ.शोभा साहेबराव चौधरी सिस्टर सेवानिवृत्त झाल्या.
सेवानिवृत्तीच्या सोहळ्या प्रसंगी, चोपडा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांनी त्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ भेट देऊन त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी डॉ.गोसावी यांनी सौ. चौधरी यांनी त्यांच्या सेवेच्या काळात बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीचा उल्लेख केला.
प्रसंगी.. कार्यक्रमाला तालुका हिवताप पर्यवेक्षक-जगदीश बाविस्कर, तालुका आरोग्य सहाय्यक-विजय देशमुख, वैद्यकीय अधिकारी-डॉ.पवन सुशिर, डॉ.अर्चना पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ-पायल गोसावी, औषध निर्माण अधिकारी-विजया गावित, आरोग्य सहाय्यक-यशवंत पाटील, राहुल नेहरकर, आरोग्य सेवक- सुभाष पिंपळसेंडे, कैलास बडगुजर, रमेश पवार, क. सहाय्यक-संजय बोरसे, जीएनम-शेख शेजल, परिचर-धुडकू वारडे, गट प्रवर्तक- संध्या बोरसे, शालिनी सोनवणे, यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्यांनीही सौ.चौधरी यांच्या सेवाकार्याबद्दल गौरवोद्गार काढले व त्यांना सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सौ.शोभा चौधरी यांनी त्यांच्या प्रदीर्घ सेवा प्रवासात दिलेल्या निस्वार्थ योगदानाचा आरोग्य विभागाकडून आदरपूर्वक उल्लेख करण्यात आला.