Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


वाडे येथे बैलाच्या अंगावर वीज कोसळून बैल जागीच ठार .

*वाडे येथे  बैलाच्या अंगावर वीज कोसळली बैलाच्या जागीच मृत्यू

सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
वाडे तालुका भडगाव येथे दिनांक 29 जून रोजी झालेल्या पावसाने सायंकाळी वाडे तालुका भडगावयेथील प्रगतीशील शेतकरी श्री. तुकाराम राघो चौधरी यांच्या वाडे शिवारालगत टेकवाडे बुद्रुक शिवारातील शेतात कोसळली त्यात. शेतात आंब्यांच्या झाडाखाली बांधलेल्या जनावरांपैकी सर्जा राजाच्या खिलारी जोडीपैकी एका बैलावर अचानक विज कोसळुन एक बैल जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. सध्या खरीप हंगामात पिक पेरण्या व शेती कामे जोरात सुरू असताना सर्जा राजाच्या जोडीतील एका बैलाच्या मृत्यू झाल्याने शेतकरी कुटुंबावर  मोठे संकट निसर्गाने ओढावलेले आहे.शेतकर्याने शेती मातीची सेवा करतांना जगावे कसे? ही हा प्रश्न निर्माण झाला आहे  शेतकर्यांसाठी चिंतनाचा विषय आहे.ज्याचे जळते त्यालाच कळते आजच शेतात शेतकऱ्यांकडे शेतात काम करण्यासाठी करण्यासाठी बैल उपलब्ध नसल्याने अस्मानी संकट ओढवले आहे.तरी शासनाने गरीब शेतकरी कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत आपत्कालीन  निधी तुन तात्काळ देण्यात यावी अशी अपेक्षा सर्व स्तरातून व शेतकरी वर्गाकडून होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.