*माऊली क्लिनिकच्या सामाजिक उपक्रमातून तब्बल 1100 बालकांना पोलिओ लसीकरण
*पुनावळे (पुणे )
*“निरोगी बालक – सक्षम भारत” या संकल्पनेला साकार रूप देत माऊली क्लिनिक (१+२) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेले भव्य पल्स पोलिओ लसीकरण शिबिर अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. देशाला पोलिओमुक्त ठेवण्यासाठी शासन राबवत असलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले.*
*रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी पुनावळे येथील माऊली क्लिनिक येथे आयोजित विशेष शिबिरामध्ये पाच वर्षांखालील तब्बल 1100 बालकांना पोलिओ लसीचे डोस देण्यात आले. .*
प्रत्येक बालकाला माऊली क्लिनिकच्या वतीने प्रेमपूर्वक बिस्किट पुडा व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.
PCMC येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा बनसोडे मॅडम, नगरसेविका सौ. श्रुती ताई वाकडकर, शिक्षण सभापती श्री. चेतन भाऊ भुजबळ, नगरसेविका सौ. रेश्मा ताई भुजबळ, श्री. रविंद्र भाऊ पवार, श्री. सूरज भाऊ पांढरे, शिवदास महाजन , डॉ शशिकांत व्यवहारे डॉ रजनी मॅडम विक्रम, रोहित मुकेश, राजा भाऊ भोसले तसेच रावेत पोलीस स्टेशनचे कुंभार साहेब (Police Inspector) व परकाळे साहेब (PSI) यांच्यासह रावेत व हिंजवडी पोलीस स्टेशनमधील अधिकारी उपस्थित होते.* समाजसेवेतून आरोग्य सेवा हा संदेश या मोहिमेतून प्रभावीपणे देण्यात आला..
.*