Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


योगा बरोबर वृक्षारोपण व संवर्धन निरोगी राहण्याचा मूलमंत्र - डॉ . सुरेंद्र सिंग पाटील

*निरोगी शरीरासाठी योगासनाबरोबर वृक्षारोपण करावे. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील* यांचे आवाहन                    आपले आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी 2014 ला संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाचा विचार मांडला त्यास मोठ्या प्रमाणात समर्थन भेटून  संयुक्तराष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला.हा दिवस आपल्यासाठी भूषणावह आहे हा दिवस आपले शरीर योगासनाद्वारे स्वस्थ, निरोगी, तणाव मुक्त राहण्यासाठी जनजागृती व्हावी या दृष्टीने साजरा केला जातो. आपण सकाळी पाच ते सहा वाजे दरम्यान सकाळी सकाळी हवा शुद्ध असते या दृष्टीने पायी फिरायला जातो  तसेच सायकलिंग, रनिंग करत जातो. तेव्हा मोकळ्या जागी योगासन करत असतो. परंतु सद्यस्थितीत  पर्यावरण पूरक झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने वातावरणात ऑक्सिजनची निर्मिती न होता अशुद्ध हवेची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत आहे.                               या अशुद्ध हवेमुळे मोठ्या प्रमाणात फुफुसांचे , हृदयाचे विविध प्रकारचे दुर्धर आजार होत असून मानसिक आरोग्यावरही मोठ्या प्रमाणावर परिणाम दिसून बहुसंख्य जनता शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त आहेत. त्यासाठी योगासनाद्वारे मोकळा श्वास घेत ऑक्सिजन युक्त हवा आपल्या शरीरात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करणारे वृक्ष संगोपन व संवर्धनाच्या जबाबदारी सह या पावसाळ्यात पर्यावरणपूरक झाडे लावण्याचा  योगासनाबरोबर संकल्प करूया. तसेच आदरणीय प्रधानमंत्रीजी यांच्या एक पेड माँ के लिये अभियानातही सहभागी होऊ  या असे आवाहन . डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.