Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वृक्षरोपणाने करा डॉ . सुरेद्रसिंग पाटील यांच्या आवाहन

*नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात वृक्ष प्रतिज्ञाद्वारे करावी.                       
 शालेय जीवनात विद्यार्थ्यांमध्ये झाडे संवर्धनाचे संस्कार गरजेचे. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील*    
         15 जून पासून नवीन शैक्षणिक वर्ष 2026/27 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होत आहे. शालेय जीवनात आपणावर जेही संस्कार होतात त्यानुसार आपली प्रत्येकाची पुढील वाटचाल होत असते. शालेय जीवनात घडत असलेले संस्कार अत्यंत महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड तसेच जंगलक्षेत्र कमी होत असून झाडांची संख्या  कमी होऊन तापमानवाढीसह वातावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण निर्माण होत आपणास  कोरोनासारख्या आजारांसह अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच निसर्गाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक निसर्गनिर्मित पशुपक्षी प्राणी इतर सर्व सजीवांचे अस्तित्व धोक्यात आहे. म्हणूनच शालेय जीवनात झाडांबद्दल तसेच इतर सजीवांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होऊन  वृक्षारोपण त्यांचे संगोपन, संवर्धन, संरक्षण का गरजेचे आहे यांचे संस्कार निर्माण होऊन पर्यावरण संतुलनासाठी मोठा हातभार लागेल. प्रतिज्ञा पुढीलप्रमाणे  सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो. पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देते,फुल देते,पान देते,पक्षांना उडण्यासाठी रान देते, श्वासासाठी ऑक्सिजन देते, सर्व गोष्टी देते झाड,आईच्या प्रेमाने झाड करते आपले लाड. झाड आहे आपले औषध, झाड आहे आपले देव, झाड आहे तर आपली सुद्धा निरोगी वाढ आहे याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये झाडे लावू , झाडे जगवू ही प्रेरणा निर्माण करत या पावसाळ्यात त्यांच्याद्वारे वृक्षारोपण ही करूया. सदर प्रतिज्ञा वृक्ष लावून घेतल्यास अधिक चांगली. सर्व शासकीय निमशासकीय अधिकारी तसेच सर्व शाळांचे पदाधिकारी मुख्याध्यापक व शिक्षक सर्वांनी लक्ष घातल्यास  शाळेतील व आजूबाजूचा परिसर तसेच आपले गाव हिरवेगार होण्यास मदत होईल तसेच निसर्गासाठी आपले कर्तव्य म्हणून काहीतरी योगदान दिल्याचे समाधान होईल. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.