Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


इनरव्हील क्लबच्या पदाधिकारी महिलांचा नाशिक येथे सन्मान


इनरव्हील क्लब भुसावळच्या पदाधिकाऱ्यांचा नाशिक येथे सन्मान
भुसावळ प्रतिनिधी (मनोहर लोणे ) 
 नाशिक येथे  सात जून रोजी संपन्न झालेल्या इनरव्हील डिस्ट्रीट 303 अवार्ड वितरण सोहळ्यात भुसावळ येथील पदाधिकारी यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
या विशेष पुरस्कार वितरण सोहळ्यात भुसावळ  येथील इनरव्हील  क्लबचे अध्यक्षा सुनंदा भारुळे  यांना स्टेटस ऑफ वुमन फॅमिली वेलफेअर  हा पुरस्कार , तसेच क्लब सेक्रेटरी . सौ  सविता शुक्ला  बेस्ट सेक्रेटरी अवार्ड तर ट्रेझरर संगीता चांडक यांना एक्स्लेंट फायनान्शियल मॅनेजमेंट अवॉर्ड व   वैशाली भगत यांना मोस्ट इनोव्हेटीव्ह  हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे  .
 या यशाबद्दल डॉक्टर रश्मी शर्मा , ॲडव्हायझर विमल राव , कमल सचदेव , मनीषा तायडे रजनी सावकारे , माजी  अध्यक्षा व सदस्यांनी विजेत्या महिला पदाधिकाऱ्यांचे  अभिनंदन केले आहे .
 या यशामुळे आम्हाला समाजासाठी जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे यावेळी  विजेत्यांनी सांगितले आहे .
विविध जिल्ह्यातील ८० क्लब मधून भुसावळ च्या क्लबची निवड झाल्याने ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.