अधिक महिन्यात वृक्षदान करून संगोपन करा . डॉ. सुरेंद्रसिंग पाटील
June 03, 2026
0
*अधिक मासात सर्वश्रेष्ठ दान निसर्गदेवतास प्रिय भूमातेवर वृक्षदान करून त्याचे संगोपन करावे. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील* अधिक मास हा हिंदू कॅलेंडरनुसार दर 32.5 महिन्यांनी साधारण अडीच ते तीन वर्षांनी हा महिना अतिरिक्त महिना येत असतो. हा महिना जेव्हाही येतो तेव्हा या महिन्यात केलेले दानधर्म पूजा जप उपासना केल्याने पुण्यफळ मिळते. या महिन्यांमध्ये अनेक प्रकारे विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात सद्यस्थितीत आपल्याकडून कळत नकळत निसर्गास आव्हान देत आपल्या येथे आपणास व सर्व निसर्गनिर्मित सजीव सृष्टीला आवश्यक ऑक्सीजन युक्त दीर्घकाळ टिकणारी झाडे विविध फळेफुलांची झाडे आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पर्यावरण असमतोल निर्माण होत आपणास अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी मोठ्या तापमान वाढीला सामोरे जावे लागत आहे अनेक ठिकाणी भूकंप चक्रीवादळ होत असून बहुसंख्य ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस मोठ्या प्रमाणात होत असून शेतीतील माती वाहून शेती नापीक होत आहे गावांमध्ये घरांमध्ये पाणी शिरत असून अनेक गुरे ढोरे अचानक येणाऱ्या पुरामुळे आपल्या डोळ्यासमोर वाहून जात आहे. आपले स्वतःचे जगणे असुरक्षित झाले आहे आपणासही अनेक रोगांचा सामना करावा लागत आहे. निसर्ग कोपला की काय होते याचा प्रत्यय प्रत्येकाला येत आहे यंदा योगायोगाने पूजेचा दानधर्माचा अधिक महिना हा 15 जून पर्यंत आहे. आपण सर्व निसर्गाचे लेकर आहोत त्यामुळे निसर्ग पूजा ही आपणास अत्यंत महत्त्वाची आहे ज्या भू मातेच्या साह्याने आपण जन्मलो तसेच राहत आहे त्या भूमातेचे अस्तित्व टिकण्यासाठी तसेच भूमातेवरील आपणासहीत निसर्गनिर्मित सर्व सजीवांच्या अस्तित्वासाठी मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या देशी झाडे तसेच विविध फळे फुलांची झाडांची लागवडीची वृक्ष देवतेचीअत्यंत आवश्यकता आहे. झाडे ही देवत्वाची केंद्र आहेत . यंदा अधिक महिना 15 जून पर्यंत म्हणजेच पावसाळ्याचा सुरुवातीचा काळ आहे हा वृक्ष लागवडीसाठी अत्यंत महत्त्वाचा आपणास निसर्गास प्रिय भूमातेवर सर्वश्रेष्ठ असलेल्या वृक्ष दानासाठी मिळालेला योगायोग आहे. या सर्वश्रेष्ठ दानाचा फायदा घेत आपल्या घरासमोर, दुकानासमोर, ऑफिस समोर, अन्यथा जिथे नोकरी करत असाल तिथे शेतात अथवा आपल्या घराजवळील ओपन स्पेस मध्ये जिथे ही जागा असेल तेथे या चालूअधिक महिन्यात सर्वश्रेष्ठ दान निसर्गादेवतास प्रिय भूमातेवर वृक्ष लावून वृक्ष दान करत त्याची संगोपनाची जबाबदारी आपण स्वतः घ्यावी आपले जमत नसल्यास संगोपनासाठी खर्च देऊन वृक्षदान करूया. डॉ. सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान महाराष्ट्र