Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


बकरी ईद च्या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील साकेगाव निंभोरा येथे पोलीसांचा रूट मार्च

 दिनांक २७ मे  रोजी संध्या. साडेपाच  ते साडेसात वाजेपावेतो बकरी ईद सणाच्या अनुषंगाने भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील साकेगाव व निंभोरा बु. येथे दंगा काबू योजना व रूट मार्च घेण्यात आला. 
साकेगाव येथे मरिमाता चौक - भवानीनगर - पोळा मैदान  - पटेल गल्ली - मरिमाता चौक तसेच निंभोरा बु. येथे गैबन शाह वाली बाबा दर्गा - ग्राम पंचायत - शिवाजीनगर - सर कॉलनी - चेतन हॉटेल या मार्गाने रूट मार्च घेण्यात आला. सदर वेळी पोलीस निरिक्षक महेश गायकवाड  व १५ अंमलदार तसेच २५ होमगार्ड यांच्यासह रूट मार्च घेण्यात आला. 
सण व उत्सव शांततेत तसेच कायद्याच्या चौकटीत साजरा करावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.