राशन चा वाढीव कोटा मिळण्यासाठी ना भुजबळ यांना निवेदन
वरणगांव -वार्ताहर
दिव्यांग बांधवांना अन्न सुरक्षा योजनेत कोटा वाढविण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फूले समता परिषद, जिल्हा अध्यक्ष सविता सखाराम माळी यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री ना .छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे .
निवेदनात म्हटले आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये काही दिव्यांग बांधव व गरिब गरजु नागरिकांना अन्न सुरक्षा योजनेमध्ये कोटा उपलब्ध नसल्यामुळे लाभ मिळत नाही.
तरी आपण जळगाव जिल्ह्यामध्ये अन्न सुरक्षा योजने साठी लाभ मिळावा यासाठी सहकार्य करावे. जेणेकरुन गरीब लोकांना न्याय मिळेल. भुसावळ तालुका वरणगाव मध्ये बरेचशे दिव्यांग व गरजु लोकांना अन्न सुरक्षाचा लाभ मिळेल असे नमूद केले आहे .