राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ* तर्फे आयोजित महात्मा ज्योतिबा फुले यांची १९९ वी जयंती व विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती निमित्ताने नविन उपक्रम *भीम जन्मोत्सव महिला समिती* ची स्थापना करुन त्या अंतर्गत *विविध शासकीय योजनांचा महामेळावा* दि.२९/०४/२०२६ रोजी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजता पर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकर मैदान भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ केतकी ताई पाटिल व नंदाबाई लोखंडे माजी.उपनगराध्यक्ष सावदा असुन प्रमुख उद्घाटक रजनीताई सावकारे अध्यक्ष प्रतिष्ठा महिला मंडळ व कविता ताई कोठारी समाजसेविका होते यांच्या सह प्रमुख मान्यवर संगिता ताई बियाणी ( संचालिका बियाणी एज्युकेशन गृप भुसावळ) सुमंगलजी अहिरे सर (भा. बौद्ध महासंघ अध्यक्ष) ॲड धनराज मगर सर (उपाध्यक्ष भुसावळ बारसंघ) राजेंद्र आवटे नाना नगरसेवक तथा शिक्षण सभापती , शांताराम जाधव सर ( समाजसेवक) देवाभाऊ वाणी ( नगरसेवक ) नितिन भाऊ धांडे( नगरसेवक ) प्रा. सुनित नेवे सर(अटल प्रतिष्ठान अध्यक्ष) डॉ . कैलास ठाकरे सर ( संचालक साकेगाव ग्रामीण बी.शे.सह.संस्था) राजेश चंदन सर ( गव्ह.सिव्हील इंजिनिअर )ॲड.पुरुषोत्तम पाटील सर सुदामाभाऊ सोनवणे (उ.महा.उपाध्यक्ष RPI) सुनीलभाऊ ढिवरे ( भुसावळ शहर अध्यक्ष RPI) संदेश सुरवाडे (समाजसेवक) राहुल तायडे ( आई दादा प्रतिष्ठान अध्यक्ष) राजेंद्र जावळे सर ( AVF फाउंडेशन अध्यक्ष) प्रा.सुनिल सुरवाडे सर( उपाध्यक्ष उ.महा.वं.बहुजन आघाडी) पुष्पा ताई आवटे समाजसेविका ॲड.प्रिया अडकमोल साधना भालेराव माजी नगरसेविका ॲड कृष्णा सिंग ताई ॲड विजयालक्ष्मी मुत्याल ताई ॲड विना शेंद्रे ताई अलका झनके ताई ( कम्युनिटी न.पा भुसावळ) राजश्री सोनवणे ( बी.सी.एम ता.भुसावळ)
अशोक शिंदे सर ( अध्यक्ष उपदेश फाउंडेशन)कविता ढिवरे ताई (समाजसेविका) मिनाक्षी निकम ताई (समाजसेविका )संध्या चंदेल ताई (समाजसेविका )जयश्री ताई गायकवाड ( समाजसेविका) विक्कीभाऊ मेश्राम ( समाजसेवक) रवि भाऊ तांबे ( समाजसेवक) आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी फाउंडेशन चे वतीने उपस्थित मान्यवरांना पेन व डायरी भेट देऊन स्वागत करण्यात आले.यानंतर फाउंडेशन च्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी सुत्रसंचलन करतांना सदर कार्यक्रमाचे हे १३ वे वर्ष असुन मागील १२ वर्षांपासून आम्ही फाउंडेशन चे वतीने महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न प.पु.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती उत्सव विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरी केली.यावर्षी आम्ही फाउंडेशन संचालित *भीम जन्मोत्सव महिला समिती* ची स्थापना केली व त्या अंतर्गत विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला या उपक्रमाचे उद्देश एकच होते कि सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या साठी असलेल्या विविध विभागातील कल्याण कारी योजनांची माहिती व्हावी व त्यांना समजावे कि कोणत्या विभागात कोणती योजना राबवल्या जातात या कार्यक्रमात विशेष सहकार्य व सहभागी विभाग १. जिल्हा समाजकल्याण विभाग २. जिल्हा परिषद जळगाव ३.विधिसेवा समिती भुसावळ कोर्ट ४.डाॅ. उल्हास पाटील वैद्यकीय हाॅस्पिटल & काॅलेज ५.बाल विकास प्रकल्प अधिकारी शहरी जळगाव उत्तर ६.नगरपरिषद भुसावळ ७.तालुका वैद्यकीय विभाग भुसावळ ८.पंचायत समिती ९.तहसिल कार्यालय भुसावळ यांचे योगदान लाभले भुसावळ मध्ये प्रथमतःहा महापुरुषांची जयंती निमित्त आगळा वेगळा उपक्रम राबविण्या आमचा मानस होता दुसरा कार्यक्रम न्यु.आंबेडकर नगर भुसावळ येथे परिसरातील नागरिकांनसाठी भोजणाचा कार्यक्रम व ३ रा ४० विद्यार्थी यांना फाउंडेशन संचालित अवनी दत्तक योजना अंतर्गत शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटक रजनीताई सावकारे अध्यक्ष प्रतिष्ठा महिला मंडळ यांनी मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन च्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रमाचे कौतुक करून आज महामानव यांच्या जयंतीनिमित्त विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला हा फक्त एक कार्यक्रम नाही तर जनजागृती आणि सशक्तीकरणाचा एक प्रभावी उपक्रम आहे भुसावळ मध्ये पहिल्यांदा विविध शासकीय विभागांना आमंत्रित करून थेट विभागीय प्रतिनिधी व जनतेला संवाद साधून आपल्या योजनांची माहिती दिली अनोखा उपक्रम फाउंडेशन ने राबविला यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या व महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न प.पु.डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळेच आज महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहे अशी भावना व्यक्त करत सर्वांना महामानव यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.यानंतर प्रमुख मान्यवर संगिता ताई बियाणी ( संचालिका बियाणी एज्युकेशन गृप) यांनी मनोगत व्यक्त करतांना महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त नागरिकांच्या हितासाठी योजनेची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेले या विविध शासकीय योजनांचा महामेळावा माध्यमातून नक्कीच नागरिकांना समजेल आपल्या हितासाठी योजना कोणत्या आहेत सर्व स्टाॅलचा नागरिकांना फायदा होईल अशी भावना व्यक्त केल्या.यानंतर राजेश्री सोनवणे ( B.C.M.ता भुसावळ) यांनी मनोगत व्यक्त करतांना सदर विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून यात नक्की सर्वसामान्य जनतेला माहिती होऊन योजनेचा लाभ घेणे सोईस्कर होईल अशी भावना व्यक्त केल्या.सर्वात शेवटी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नंदाताई लोखंडे माजी उपाध्यक्ष सावदा यांनी मनोगत व्यक्त करतांना महामानव यांची अशी जयंती पहिल्यांदाच सदर फाउंडेशनच्या वितिने विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करून राबविण्यात आला महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने सुंदर भेट भुसावळ करतांना देवून यातून नक्की योजनांचा नावाखाली दलालांकडून जनतेची होणारी फसवणूक थांबण्यास मदत होईल असे कार्यक्रम समाजात होणे आवश्यक आहे असे भावना व्यक्त करत फाउंडेशन चे कार्याला शुभेच्छा दिल्या.
दिवसभरात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नागरिकांनी सदर कार्यक्रमात येऊन योजनांची माहिती घेतली.
कार्यक्रमासाठी बहुजन समाजातील विविध समाज बांधवांना तसेच विविध शासकीय विभाग जळगाव व भुसावळ सर्वांचे जाहिर आभार फाउंडेशन च्या अध्यक्षा राजेश्री सुरवाडे यांनी मानले यापुढे असेच सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे सचिव निर्मला सुरवाडे सहसचिव शैला तायडे खजिनदार वंदना नरवाडे सुजाता सपकाळे माधुरी सपकाळे पुष्पा जाधव प्रमिला लोखंडे यांनी केले