थोरगव्हाण येथे देशमुख विद्यालयात मुलांनी मिळवले यश प्रेम तायडे प्रथम क्रमांकाचा मानकरी
दी एज्युकेशन सोसायटी थोरगव्हाण संचलित डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथील इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा ऑनलाइन निकाल जाहीर झाला असून विद्यालयाने यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
विद्यालयातून दहावी परीक्षेसाठी एकूण ७८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाचा एकूण निकाल ९१.०२ टक्के लागला आहे.
यामध्ये १५ विद्यार्थ्यांनी डिस्टिंक्शन, ३५ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी, १९ विद्यार्थ्यांनी द्वितीय श्रेणी तर २ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळवून यश संपादन केले.
विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये तायडे प्रेम सुनील याने ८८.६० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. अनिकेत राजेश कोल्हे याने ८७.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला तर धीरज सोपान कोळी याने ८१.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, सचिव पवन कुमार चौधरी, सहसचिव रामरावदादा देशमुख तसेच समस्त सन्माननीय संचालक मंडळ, विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे व समस्त शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तसेच पालक संघ तर्फे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.