मुक्ताईनगर कृषी अधिकारी मुक्ताईनगर यांना योग्य दरात उत्कृष्ट दर्जाचे बी बियाणे मिळणे बाबत मनसे निवेदन .
मुक्ताईनगर कृषी तालुका कृषी अधिकारी यांना खरीप हंगाम साठी लागणारे बियाणे योग्य दरात उत्कृष्ट दर्जाचे बियाणे उपलब्ध करण्यासाठी आज दिले महाराष्ट्र नवनिर्माण सेना या वतीने निवेदन खरीप हंगाम पेरणीचे दिवस जवळ आल्यावर ऐनवेळी बी बियाणे उपलब्ध होत नाहीत उशिरा झाल्यामुळे महागड्या जास्तीच्या भावाने विकले जातात व उत्कृष्ट सोडून निच्कृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांना दिले जातात त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जाते व महागाई वाढवल्यामुळे जास्तीचा पैसा शेतकऱ्यांना खर्च करावा लागतोय बऱ्याच शेतकऱ्यांना या बी बियाणे व अतिवृष्टी दरवर्षाला असल्यामुळे शेतकरी कर्जदाराचा राहतो हमीभाव तर मिळतच नाही परंतु नेहमीच खिशातला पैसा खर्च करावा लागतो त्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने तालुका कृषी अधिकारी यांना वेळेवर योग्य व उत्कृष्ट दर्जाचे बी बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या असे महाराष्ट्र नवनिर्माण सेना च्या वतीने म्हटले आहे उपस्थित तालुका अध्यक्ष विनोद पाटील मनसे तालुका अध्यक्ष मधुकर भोई शहराध्यक्ष मंगेश कोळी उप शहर अध्यक्ष लहू कोळी शेतकरी पंडित सोनवणे उत्तम जुमडे सुरेश पाटील आधी शेतकरी उपस्थित होते