वरणगाव ( मनोहर लोणे प्रतिनिधी )
एआयडीईएफच्या वतीने देहराडून येथे आयोजित २८ व्या राष्ट्रीय ऐतिहासीक अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आयुध निर्माणी वरणगाव येथून शिष्टमंडळ रवाना झाले आहे. दिनांक ३ मे रोजी या प्रतिनिधीमंडळाचे प्रस्थान झाले असून अधिवेशन ६ मे ते ९ मे २०२६ दरम्यान पार पडणार आहे.
या शिष्टमंडळाचे नेतृत्व कामगार युनियनचे अध्यक्ष विशाल भालशंकर आणि महासचिव तसेच एचएलसीसी सदस्य सुनील आर. पाटील करत आहेत.
अधिवेशनात विविध प्रलंबित मागण्यांवर ठाम भूमिका मांडली जाणार आहे. यामध्ये कामगार कायद्यांतील बदलांना विरोध, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे, ऑर्डनन्स फॅक्टरीचे निगमीकरण रद्द करणे तसेच ८ वा वेतन आयोग तातडीने लागू करणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
या महत्त्वपूर्ण अधिवेशनासाठी कार्याध्यक्ष प्रवीण आर. चौधरी, प्रमोद महाजन, संतोष (पहिलवान) चौधरी, मयूर जावळे, विष्णू मुतडक, डी. एन. पाटील, आर. जे. सुरवाडे, डी. एम. पाटील, दत्तात्रय माळी, एम. एस. पाटील, अमोल पाटील, जितेंद्र पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत.
कामगारांच्या विविध प्रश्नांवर ठोस निर्णय घेण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची प्रतिक्रिया युनियन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.