थोरगव्हाण (प्रतिनिधी)
दि. ३० एप्रिल २०२६ रोजी येथील अंगणवाडी क्र. ३ च्या सेविका सौ. शकुंतला अरूण पाटील व अंगणवाडी क्र. २ च्या सेविका श्रीमती शालिनी खेमचंद शिंदे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन थोरगव्हाण केंद्रातील अंगणवाडी शिक्षिका मदतणीस भागिनीं यांचे तर्फे करण्यात आले.
या प्रसंगी निरोपार्थी अंगणवाडी शिक्षिका तसेच विविध गावांतील अंगणवाडी शिक्षिका सेविका, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास डी. एस. देशमुख विद्यालय,येथील मुख्याध्यापक डी. के. पाटील, ज्येष्ठ शिक्षक युवराज कुरकुरे, जिल्हा परिषद मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पद्माकर पाटील, उपशिक्षक मयूर प्रकाश पाटील, उपशिक्षिका सौ . कुमोदिनी श्रीकृष्ण पाटील तसेच आशा वर्कर सरला चौधरी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच मांगी येथील अंगणवाडी सेविका पूजा घोलप, सुनवाडे येथील सेविका सुनिता सपकाळे, थोरगव्हाणयेथील अंगणवाडी कर्मचारी, सौ. अनिता नितीन तायडे (सेविका), सौ. लताबाई संतोष तायडे (मदतनीस), सौ. आरती मोहन तायडे (मदतनीस), श्रीमती सुनंदा विष्णू तायडे (सेविका) व सौ. रंजना देविदास कंखरे (मदतनीस) उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात अंगणवाडी शिक्षिकांच्या कार्याची प्रस्तावना मांडून करण्यात आली. आपल्या 32 वर्षाच्या सेवाकाळात दोन्ही सेविकांनी बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेल्या मोलाच्या योगदानाचा यावेळी गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयूर प्रकाश पाटील यांनी प्रभावीपणे केले. शेवटी उपस्थित सर्वांनी दोन्ही सेविकांना भावपूर्ण निरोप देत त्यांच्या निरोगी व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.