Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात

महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा; वार्षिक निकाल जाहीर

थोरगव्हाण प्रतिनिधी

थोरगव्हाण (ता. रावेर) – दि. १ मे २०२६ रोजी, शुक्रवार, येथील डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी शालेय समिती सदस्य नंदकुमार एकनाथराव चौधरी यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, विकासेसो अध्यक्ष व संस्थेचे संचालक मधुकर  कोल्हे , संचालक व उद्योजक चंद्रकांत सुराजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी शालेय वार्षिक निकाल जाहीर केला. तसेच महाराष्ट्र दिनाचे महत्त्व आणि शाळेची उज्वल परंपरा याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी उद्योजक तथा संचालक चंद्रकांत सुराजी पाटील यांनी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५ वी ते ९ वी व ११ वी इयत्तांसाठी तुकडी निहाय बक्षिसे जाहीर केली.
कार्यक्रमादरम्यान गावातील निःशुल्क सेवा देणाऱ्या शिक्षिका सौ. योगिता झोपे, सौ. महेश्वरी झोपे व सौ. कोमल चौधरी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
ध्वज संचालन क्रीडा शिक्षक जे. ए. चौधरी यांनी केले. शिक्षिका जयश्री प्रविण चौधरी यांनी आकर्षक रांगोळी काढून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. सपकाळे यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी समस्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी आपापले गुणपत्रक स्वीकारले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.