Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शेतकऱ्यांना उसाचे पेमेंट त्वरीत द्यावे .शेतकरी संघटनेची मागणी ' आंदोलनाचा दिला इशारा

शेतकऱ्याचे ऊस बिल त्वरित द्यावे... अन्यथा आंदोलन...
सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र लाईव्ह उपसंपादक

पंढरपूर -: शेतकऱ्याचे थकीत बिल एफ.आर.पी कायद्यानुसार 15 टक्के व्याज असं त्वरित मिळावे अन्यथा तीव्र स्वरूपाच्या आंदोलन केले जाईल आपल्या कारखान्याकडे पंढरपूर माळशिरस सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस गाळपसाठी आला असून हंगाम संपूनही तीन-चार महिने उलटून गेले तरीही कारखाना प्रशासनाने अद्याप ऊस बिल शेतकऱ्याला दिले नसून एफ.आर.पी कायद्याची अंमलबजावणी न करता शेतकऱ्यांना वेटीस धरले आहे कायद्यानुसार एफ आर पी देणे बंधनकारक असून शेतकऱ्यांना हक्काचे पैसे तात्काळ द्यावे अन्यथा आपल्या सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला...

यावेळी ऊस दर‌ संघर्ष समितीचे समाधान फाटे, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सचिन आटकळे, कांतीलाल नाईकनवरे, अनिल बागल, शाहजीनाना जगदाळे, शिवाजी नागटिळक, शेतकरी सचिन जवळेकर, विजय मोरे, सागर दगडे इतर उपस्थित होते...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.