Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


शिंदी येथे भिम जयंती उत्सव साजरा

शिंदी येथे महामानवांच्या विचाराला अनुयायी नतमस्तक ....
सर्व धर्मीय सहभागाने जयंती सोहळा अविस्मरणीय ....
भीम गीतांच्या सुरावटीत तरुणांसह वृद्धांचीही थीरकली पाऊले....
शिंदी, ता. भुसावळ( वार्ताहर)--- येथे गुलामगिरीचे साखळदंड तोडणारे, मुक्तपणे श्वास घेण्याचे स्वातंत्र्य बहाल करणारे आणि भारताच्या आधुनिक जडणघडणीचा अध्याय लिहिणारे संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
जयंतीदिनी सकाळी नागसेन बुद्ध विहारात महामानवांच्या विचारांना अनुयायी नतमस्तक झाले. गौतम बुद्ध ,विश्वरत्न डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात येऊन सामूहिक त्रिशरण पंचशील ग्रहण करीत बुद्धवंदना घेऊन प्रज्ञासूर्याला वंदन करण्यात आले.   ग्रामविकास अधिकारी महिपाल धुरंधर यांनी सामाजिक समता ,शिक्षणाचे महत्व, संविधान निर्मिती यावर माहिती दिली. सरपंच सौ. सुनिता सपकाळे ,उपसरपंच कैलास पाटील, पो. पा. अतुल पाटील, ग्रा.पं.सदस्य युनूस शहा सरोवर शहा मनोज चौधरी क्रीडाशिक्षक व्ही. एस .पाटील, रा. काँ.पा.(अजित पवार गट) युवक ता.अध्यक्ष जगदीश पाटील, ग्रा.पं.ऑपरेटर इस्राइल शहा, सामाजिक कार्यकर्ते तथा सरपंच पती संदीप सपकाळे ,मा. उपसरपंच सिद्धार्थ तायडे व बौद्ध उपासक ,उपासिका, सर्वधर्मीय कार्यकर्ते उपस्थित होते.
सायंकाळी डीजेच्या तालावर जयंती निमित्त मिरवणूक काढून शोभायात्रेद्वारे अभिवादन करण्यात आले .यावेळी सुरुवातीस उद्धरली कोटी कुळे !भिमा तुझ्या जन्मामुळे! अशा गीतांच्या निनादात सामूहिक त्रिशरण, पंचशील ग्रहण करीत बुद्ध वंदना घेण्यात आली. जयघोष करीत महामानवाला अभिवादन करण्यात आले . मिरवणुकीचे सुरुवातीस जळगाव जि.माध्य.शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे ,सरपंचपती तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप सपकाळे सरपंच सौ सुनीता सपकाळे,अजित पवार गट युवा ता .अध्यक्ष जगदीश पाटील ,मा .उपसरपंच भीमराव तायडे, पो.पा.अतुल पाटील यांचे सह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.व मिरवणुकीस उत्साहात सुरुवात करण्यात आली. यावेळी आंबेडकरी अनुयायांसह सर्व धर्मीयांची गर्दी उसळली होती.
तू आभाळाची शान भीमा! तू धरती हून विशाल बा भिमा! अशा गीतांच्या निनादात मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. भीम गीतांच्या सुरावटीत  तरुणाईसह वृद्धांचीही पावले थीरकली . जयंतीनिमित्ताने भीम जयंतीचा महा कुंभ जयघोषाने यावेळी आसमंतात दुमदुमला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी संदीप सपकाळे, पितांबर सुरवाडे, अनिल तायडे, सुनील तायडे, कृष्णा सपकाळे, सुधीर जाधव, धीरज सोनवणे, दर्शन बिऱ्हाडे, सिद्धार्थ तायडे यांचेसह जयंती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.