विद्यार्थ्यांमध्ये संविधान व सामाजिक जाणीव जागृती
थोरगव्हाण (प्रतिनिधी) :
दि. १४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व पंचशील मित्र मंडळाच्या वतीने बुद्ध विहारात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लोकनियुक्त सरपंच रेखाताई शालिक तायडे यांचे शुभ हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या जीवनकार्यावर आधारित परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत १० ते १४ वर्षे वयोगटातील एकुण 22 विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने व मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रोख बक्षिस पमाणपत्र कार्यक्रमात दिले जाणार आहे .
यावेळी विद्यार्थ्यांनी डॉ .बाबासाहेबांच्या विचारांवर आधारित प्रभावी भाषणे व अभिमान वाटावा अशी मार्मिक गीत सादर केली. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची थोडक्यात माहिती देण्यात आली, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली.
थोरगव्हाण गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ. रेखा शालिक तायडे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत त्यांचे कौतुक केले.
तसेच विद्यार्थ्यांसाठी संविधान सभेवरील पोस्टर प्रदर्शन व नशाबंदी विषयक जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीवेचे महत्त्व पटवून देण्यात आले. हा कार्यक्रम अक्षय तायडे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह यशस्वीपणे आयोजित केला.
कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांना बिस्कीट वाटप करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सर्व पंचशील मित्र मंडळाचे अनमोल सहकार्य लाभले.
▪ आयोजक :
सर्व पंचशील मित्र मंडळ थोरगव्हाण
▪ कार्यक्रम प्रमुख :
अक्षय तायडे
▪ कार्यकर्ते :
पंकज तायडे, विशाल तायडे, अक्षय तायडे, ईश्वर तायडे, आकाश भालेराव, प्रसन्न अजित तायडे, पराग तायडे, स्वप्निल तायडे , भगवान तायडेयांनी स्वच्छता , विद्युत रोशनाई नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांचे प्रबोधनामक पोस्टर प्रर्देशन , संविधान जागर साठी अथक प्ररिश्रम घेतले .