Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


स्वामी समर्थ प्रगटदिनी पूरक वृक्षांची लागवड करावी

*श्री स्वामी समर्थ प्रकट दिवस,  संत झुलेलाल जयंती जागतिक चिमणी दिवस एकमेकास पूरक वृक्ष लावण्याचा संकल्प करावा डॉ. सुरेंद्रसिंग पाटील*                    चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी भगवान दत्तात्रयाचे तिसरे पूर्ण दत्तावतार  सन 1856 मध्ये अक्कलकोट येथे स्वामी समर्थ म्हणून दर्शन दिले असे मानले जाते. अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात तसेच जिथे जिथे स्वामी समर्थ महाराज मंदिरात सर्व भक्त मोठ्या श्रद्धेने श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन साजरा करत असतात जिथे जिथे स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर आहे तेथे भगवान गुरुदत्तांना प्रिय दत्त रूपात औदुंबराचे झाड प्रत्येक ठिकाणी आहे. तरी सर्व श्री स्वामी समर्थ भक्तांनी सद्यस्थितीत आपल्याला ऑक्सीजनयुक्त वृक्ष लागवडीची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे तरी प्रत्येक  श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांनी तसेच भगवान गुरुदेव दत्त यांच्या रूपात प्रत्येकाने आपण राहत असलेल्या घराजवळील ओपन स्पेस मध्ये गुरुदत्त यांच्या रूपात दत्ता वतारऔदुंबराचे झाड संगोपनासहित लावावे. त्याद्वारे आपणास प्रिय असलेल्या दत्तावतार रूपात आपण मानत असलेल्या भगवंताचे दर्शन आपणास रोज होईल व निसर्गास आवश्यक पर्यावरण पूरक वृक्षाची लागवड होईल तसेच श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रिय असलेल्या प्रसाद रूपाने आवळ्याची झाड सुद्धा ओपन स्पेस मध्ये अथवा आपल्या घराजवळ संगोपनासहित लावावे.                तसेच चैत्र शुद्ध द्वितीयाला संत झुलेलाल जयंती संत झुलेलाल वरूण देवता म्हणजे जलदेवता चा अवतार मानला जातो या दिवसाला चेटीचंड या नावाने म्हणतात चैत्र शुद्ध द्वितीया म्हणजेच सिंधी नववर्षाची सुरुवात जलदेवता म्हणजे पाण्यासाठी आपणास  वृक्ष देवतेची गरज आहे वन है तो जल है असे म्हटले जाते वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होताना त्यांच्या मुळाद्वारे जमिनीत पाणी पोहोचवण्याचं काम होत असते ऑक्सीजन युक्त मोठ्या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झालेली असल्यामुळे आपणास अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे तरी सर्व सिंधी बांधव व भगिनी यांनी संत झुलेलाल म्हणजेच जल देवता यांना आवश्यक  प्रसादरुपी ऑक्सीजनयुक्त वृक्ष संगोपनासहित आपल्या घराजवळ अथवा दुकानासमोर अथवा व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी या नवीन वर्षात संगोपनासहित लावण्याचा संकल्प करावा       20 मार्च 2026 जागतिक चिमणी दिवस चिमणी लहान मुलांना लहान मुलांचा सर्वात आवडता पक्षी लहान मुलांना खाऊ घालताना चिमणी चे गाणे गात आई आपल्या बाळाला खाऊ घालत असते सद्यस्थितीत झाडांची संख्या कमी झाल्यामुळे चिऊताईचे अस्तित्व धोक्यात आले आहे चिऊताई राहण्याच्या दृष्टीने त्यांच्या संवर्धनासाठी व आठवणीसाठी 20 मार्च हा दिवस चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो योगायोगाने चैत्र शुद्ध द्वितीया असल्यामुळे श्री गुरुदेव दत्त अवतार श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन औदुंबराचे झाड म्हणजेच वृक्ष देवतेच्या रूपात आपण गुरुदत्त यांचे दर्शन घेतो. तसेच योगायोगाने चैत्र शुद्ध द्वितीया सिंधी समाजाचा आद्य दैवत जलदेवतेच्या रूपात संत झुलेलाल जयंती सिंधी समाज नववर्षाच्या रूपात साजरी करत असतात. योगायोगाने जल म्हणजे पाण्यासाठी वृक्षदेवतेची आवश्यकता तसेच चिमणी दिवस चिमण्यांच्या अस्तित्वासाठी झाडांचे नितांत आवश्यकता आहे.  जलदेवतेला तसेच चिमणी पक्षीच्या अस्तित्वासाठी दोघांसाठी आवश्यक वृक्षांची आवश्यकता आहे तरी सर्वांनी संगोपनासहित वृक्ष लागवड करत आदरणीय प्रधानमंत्री जी द्वारा एक पेड माँ के लिये अभियानातही आपला सहभाग दिसेल. श्री स्वामी समर्थ जय झुलेलाल जय चिऊताई जय वृक्षदेवता डॉ सुरेंद्रसिंग पाटील संचालक पर्यावरण जागर प्रतिष्ठान

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.