Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


जागतिक चिमणी दिना निमित्त विद्यार्थ्याची भेट

जागतिक चिमणी दिनानिमित्त ‘श्री शिवाजी चिमणी घराला’ विद्यार्थ्यांची भेट

थोरगव्हाण  प्रतिनिधी

जागतिक चिमणी दिनानिमित्त थोरगव्हाण येथील श्री शिवाजी चिमणी घराला डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक भेट दिली. या प्रसंगी संस्थेचे संचालक  मधुकर कोल्हे, मुख्याध्यापक डी. के. पाटील तसेच पालकसंघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत कोल्हे यांची उपस्थिती लाभली.
यावेळी मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, श्री शिवाजी चिमणी घरात सुमारे ३५ कृत्रिम घरटी असून त्यामध्ये चिमण्यांचे वास्तव आहे. विशेष म्हणजे परिसरात सतत वर्दळ व यंत्रसामग्रीचे काम सुरू असतानाही चिमण्या या घरट्यांमध्ये आपली वीण वाढवत आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे. चिमण्यांच्या संवर्धनासाठी प्रत्येकाने आपल्या घराजवळ पाण्याची सोय करावी व त्यांचा अधिवास वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने चिमण्या पाहून त्यांच्याबाबत उपयुक्त माहिती जाणून घेतली. पक्षीप्रेमी कलाशिक्षक एस. बी. सपकाळे तसेच वाय. जे. कुरकुरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात एस. पी. पाटील यांनी वर्कशॉपमधील यंत्रसामग्रीची माहिती देत विविध करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रभावी प्रास्ताविक करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.