(सतीश पाटील उपसंपादक )
24/03/206 मंगळवार रोजी,
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिनजी भायेकर यांच्या आदेशानुसार,
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.विशाल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तथा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गिरीश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली..24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून चोपडा तालुक्यातील भगिनी मंडळ संचलित- समाजकार्य महाविद्यालयात क्षयरोग दिवस साजरा करण्यात आला.
या प्रसंगी...समाजकार्य महाविद्यालयाचे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना क्षयरोग या आजारा विषयी माहिती देऊन, क्षयरोग हा आजार उपचारतून पूर्णपणे बरा होणार आजार असून समाजात TBबाबत जनजागृती कशी करता येईल, व आजारावरील औषधोपचार घेऊन 100% बरा होणार असून, याची लक्षणे, दोन आठवड्यापेक्षा जास्तीचा खोकला, भूक मंदावणे, वजन कमी होणे आदी लक्षणं दिसल्यास कोणत्याही शासकीय रुग्णालयात त्याची मोफत तपासणी, मोफत औषधोपचार तसेच मोफत मार्गदर्शन केले जाते, इत्यादी बाबतीतचे सविस्तर मार्गदर्शन तालुका क्षयरोग प्रयोगशाळा पर्येंवेक्षक-श्री किशोर सैंदाने यांनी केले...
जगतिक क्षयरोग दिवस करणेसाठी...तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक- विजय देशमुख, तालुका क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक-किशोर सैंदाने, व तालुका क्षयरोग समन्वय-राहुल सोनवणे यांनी मार्गदर्शन केले.
तसेच... प्राचार्य-डॉ.ईश्वर सौंदाणकर, प्राध्यापक- डॉ.राहुल निकम, प्राध्यापक- डॉ.उत्तम सोनकांबळे आणि समस्त विद्यार्थी यांनी क्षयरोग दिवस साजरा करण्यासाठी अनमोल योगदान दिले.