राजेश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे महिला जागतिक दिना निमित्त स्त्रीशक्ती पुरस्कार सोहळा २०२६ दि.१८/३/२०२६ रोजी दु. १:३० वाजता न्यु. आंबेडकर नगर भुसावळ येथे आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताबाई सुरवाडे नगरसेविका तर उद्घाटक राजेश्री पगारे समाजसेविका होत्या तर प्रमुख मान्यवर साधना भालेराव माजी. नगरसेविका, अर्चना सातदिवे नगरसेविका,रत्नाबाई जाधव समाजसेविका, कविता ढिवरे समाजसेविका , संगिता भामरे दक्षता समिती सदस्य, सुनिता अहिरे समाजसेविका यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित मान्यवरांना फाउंडेशन च्या वतिने पेन व डायरी देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे यांनी केले .
दरम्यान फाउंडेशन च्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे समाजातील तळागाळातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ११ महिलांना स्त्रीशक्ती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असून यावर्षी फाउंडेशन ने भुसावळ मधिल बहुजन समाजातील ग्रामीण व शहरी भागातील ११ आशा वर्कर यांची निवड केली आशावर्कर हे लोकांना आरोग्य सेवा मिळवून देतात जागरूकता वाढवितात आणि समाजाच्या विकासात मोठे योगदान देतात याकरिता यात ज्या महिला अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत अशा महिलांची निवड केली आहे सदर उपक्रमाचे हे ४ थे वर्ष असुन मागिल ३ वर्षात देखिल विविध क्षेत्रातील महिलांना सदर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे सदर उपक्रम राबविण्याचा उद्देश आहे कि महिलांना त्यांच्या क्षेत्रात करित असलेल्या कार्याला अधिक उर्जा मिळो व समाजहिताचे कार्य यापुढे असेच करावे याविषयी सांगितले.. अध्यक्षस्थानी शांताबाई सुरवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना आशावर्कर हि ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेची महत्त्वाची कडी असल्याचे सांगितले व फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या...प्रमुख मान्यवर राजेश्री पगारे समाजसेविका यांनी मनोगत व्यक्त करतांना महिलांनी अधिक चांगले व समाजहिताचे कार्य यापुढे असेच करावे याविषयी बोलुन महिला जागतिक दिना निमित्त शुभेच्छा दिल्या,
माजी.नगरसेविका साधना भालेराव यांनी महिलांना अशीच प्रगती करून महिलांनी अधिक शिक्षण घेऊन संघटीत व्हावे अशी भावना व्यक्त केली.नगरसेविका अर्चना सातदिवे यांनी मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन च्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांना सन्मानीत करण्याचा हा उपक्रम राबविला व समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचून कर्तृत्ववान महिलांची निवड करून समाजातील उपेक्षित घटकांला सन्मानित करण्याचा हाउत्कृष्ट उपक्रम राबविला जात असून उपस्थित महिलांना महिला जागतिक दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. समाजसेविका रत्नाबाई जाधव यांनी मनोगत व्यक्त करतांना सर्व आशावर्कर यांना अभिनंदन करून त्यांनी यापुढेही समाजहिताचे कार्य आपल्या हातुन घडो अशी भावना व्यक्त केल्या. समाजसेविका संगिता भामरे यांनी मनोगत व्यक्त करतांना फाउंडेशन दरवर्षी प्रमाणे यंदाही महिलांना सन्मानीत करण्यासाठी निस्वार्थ भावनेने राबविला जाणारा हा उपक्रम स्तुती करण्याजोगे असल्याची भावना व्यक्त करत उपस्थित सर्व महिलांना ८ मार्च महिला जागतिक दिवस का साजरा केला जातो यावर माहिती दिली व महिला जागतिक दिना निमित्त शुभेच्छा दिल्या.समाजसेविका सुनिता अहिरे यांनी सदर कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना समाजात महिलांचे योगदान हे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले व उपस्थिततांना महिला जागतिक दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. यानंतर
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ११ आशावर्कर चंद्रकला कापडणे,सविता तायडे,सोनी गोडवे,हर्षलता चाले,सरिता मोरे , अर्चना नेहते,अनिता समुदरे, सरला कोळी, विजया महाजन, प्रियंका चौधरी , वैशाली तायडे यांना स्री शक्ती पुरस्कार २०२६ देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी आशावर्कर यांना भावना व्यक्त केल्या कि सदर पुरस्कार हा आम्हाला अधिक बळ देणारा असुन फाउंडेशन ने आमच्या कार्याची दखल घेऊन आम्हा सन्मानित केले याकरिता आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी फाउंडेशन अध्यक्ष राजेश्री सुरवाडे सचिव निर्मला सुरवाडे सहसचिव शैला तायडे, खजिनदार वंदना नरवाडे , सुजाता सपकाळे, माधुरी सपकाळे, पुष्पा जाधव,वंदना चोरपगार, मनिषा निकम, प्रमिला लोखंडे यांनी परिश्रम घेतले.