भूसावळ
. 15 मार्च जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने तहसील कार्यालय, भुसावळ येथील सभागृहात दि . 16 मार्च संध्याकाळी पाच वाजता ग्राहक जागृती दिन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमात ग्राहकांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यासाठी विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पन किरणकुमार बोलके यांचे शुभहस्ते संपन्न झाले .ग्राहक पंचायत महाराष्ट्र पदाधिकारी यांचे स्वागत रोशना रेवतकर यांनी केले .
कार्यक्रमास तहसीलदार नीता लबडे यांनी आयोजन बाबत मर्गदर्शन केले शुभेच्छा दिल्या, पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशना रेवतकर मॅडम, निवासी नायब तहसीलदार शोभा घुले मॅडम, नायब तहसीलदार प्रीती लुटे मॅडम, नायब तहसीलदार पूजा अवघडे मॅडम यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी ग्राहक पंचायत महाराष्ट्र या संस्थेच्या प्रबोधनात्मक कॅलेंडरचे उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. प्रमोद लोणे (सेवानिवृत्त पीएसआय, भुसावळ शहर वाहतूक शाखा) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्राहक पंचायत महराष्ट्र यांचे वतीने श्री. निलेश देशमुख यांनी ऑनलाईन खरेदी करतांना होणारी फसवणूक कशी टाळता येईल साठी घ्यावयाची काळजी बाबत तसेच या वर्षाची प्रबोधन थीम " सुरक्षित उत्पादने व आत्मविश्वासू ग्राहक "' बाबत ग्राहकांचे हक्क माहिती दिली तसेच प्रवासी महासंघ जिल्हा जळगांव उपाध्यक्ष श्री. किरणकुमार बोलके यांनीही ग्राहक जागृती बाबत प्रभावी मनोगत व्यक्त करतांना सोने खरेदी करतांना हॉलमार्क 'पाहणे पॅकिंग खादय पदार्थ , अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा याबाबत ध्यवयाची काळजी तसेच .औद्योगिक वस्तू यावर असणारा आयएसआय मार्कआणि शेती विषयक वस्तू यावर असणारा ॲगमार्क प्रमाणित वस्तु खरेदीला प्राधान्य द्यावे याबाबत सखोल मार्गदर्शन केले . प्रमाणित वस्तु मधे ऋटीअसल्यास गव्हरमेंट वेबसाईटवर आपली तक्रार नोंदवा तिचे निरसन केले जाते असे प्रतिपादन केले .
नायब तहसीलदार प्रीती लुटे मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनात पूर्वी अस्तित्वात असलेल्या वस्तुविनिमय पद्धतीपासून आजच्या आधुनिक खरेदी-विक्री पद्धतीपर्यंत झालेल्या बदलांची माहिती दिली. तसेच ग्राहकांसाठी अस्तित्वात आलेला ग्राहक संरक्षण कायदा आणि त्या कायद्यात काळानुसार झालेले बदल याबाबत सविस्तर माहिती देऊन ग्राहकांनी आपल्या हक्कांसाठी कशाप्रकारे जागरूक राहावे असे उदाहरणांसह स्पष्ट केले.
नाशिक विभाग संघटक श्री संजय शुक्ल , जिल्हा अध्यक्ष गुरुबक्ष जगवाणी ,सचिवडॉ . नितीन धांडे यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले आहे .
कार्यक्रमाला प्रवासी महासंघ जिल्हा संघटकश्री मिलिंद मांडळकर,संघटक रावेर विभाग श्री युवराज कुरकुरे , ग सदस्य .सुयोग चौधरी वरणगांव,समाधान साळुंखे ,अधिकारी तसेच पुरवठा धारक , विविध सेवा देणारे प्रतिनिधी ,सुजान नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक बाविस्कर यांनी केले