Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथे तेजोदिप फाउंडेशनतर्फे अनंत कोटी नाटकाचे आयोजन




भुसावळमध्ये तेजोदिप फाऊंडेशनतर्फे शुक्रवार २० रोजी अनंतकोटी नाट्यप्रयोग
भुसावळ (प्रतिनीधी) शहरात श्री अक्कलकोट स्वामी महाराज प्रकट दिनानिमित्त तेजोदीप नवविचार फाऊंडेशनतर्फे अनंतकोटी नाट्यप्रयोगाचे प्रथमच शुक्रवार २० मार्च २०२६ रोजी यावलरोडवरील साईजीवन शॉपीमागील सप्तशृंगी माता मंदिर रंगमंच, के. नारखेडे शाळेजवळ, तापीनगर येथे आयोजन करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी नाशिक येथे शिक्षणासाठी आल्यानंतर रहिवासाची गैरसोय होते. ही समस्या सोडविण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून संस्थापक अध्यक्ष राजेश नेहेते व फाऊंडेशनच्या कार्यकारिणी सदस्यांना दानशूर देणगीदारांनी दिलेल्या लोकवर्गणीसह कर्ज काढून दोन वर्षांपूर्वी जवळपास ३ हजार क्वेअर फुट फाऊंडेशनच्या नावे त्र्यंबकेश्वर रोडवरील बेळगाव ढगा परिसरात जागा घेतली. आता या जागेवर भव्य वसतिगृहाचे बांधकाम करणेकामी निधी संकलनाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भुसावळ शहरात नाट्य प्रयोग उपक्रमातून निधी गोळा करून नजिकच्या काळात वसतिगृह बांधकामाचे नियोजित केले आहे. याप्रसंगी जास्तीत जास्त नागरिकांनी तिकीट खरेदी करून फाऊंडेशनला उपकृत करण्याचे आवाहन तेजोदीपतर्फे करण्यात आले आहे. तिकीट बुकींगसाठी संपर्क +919922904118. 
त्यानुसार भुसावळ शहरात २० मार्च २०२६ रोजी अनंतकोटी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. अनंतकोटी हे नाटक स्वामीचरित्राचा दर्जेदार नाट्याविष्कार असून, आतापर्यंत महाराष्ट्रासह कर्नाटक व गोवा राज्यासह भारतभर गाजत आहे. अनंतकोटी नाट्यप्रयोगात १५ पेक्षा जास्त कलाकारांची टीम कार्य करीत आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या भूमिकेत दशरथ निकम रसिकांना जागेवर खिळवून ठेवतात. हे नाटक राजन शंकर कोठारकर लिखित व दिग्दर्शित केलेले असून, नाटकास मधु रेडकर यांची संगीत साथ लाभली आहे. नाट्यप्रयोग यशस्वीतेसाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी ज्येष्ठ सदस्य मुरलीधर खर्चे, अरुण धांडे, पंकज नाले, नाना पाटील, धर्मराज देवकर, निलेश वाणी, किरण पाटील, विनायक बेंडाळे, बाळू भोगे, मुकंदा रोटे, किरण के पाटील, शिशिर भंगाळे, संध्या वराडे, मनिषा महाजन व सीमा पाटील व जळगाव जिल्ह्यातील स्वामी भक्त यांच्यासह सर्व सहयोगी सदस्य व कार्यकारिणी सदस्य हे संस्थापक अध्यक्ष राजेश नेहेते व प्रभारी अध्यक्ष संदीप राणे यांच्या मार्गदर्शनाखाली परिश्रम घेत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.