Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


थोरगव्हाण येथील देशमुख विद्यालयात ग्राहक दिना निमित्त व्याख्यान

जागतिक ग्राहक दिनानिमित्त देशमुख विद्यालयात ग्राहक जागृती व्याख्यान .

थोरगव्हाण . ता रावेर .दि. १५ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे विद्यार्थ्यांसाठी ग्राहक जागृती विषयक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात ग्राहक पंचायत महाराष्ट्र या चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ नानासाहेब बिंदू माधव जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कला शिक्षक एस. बी. सपकाळे यांनी जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. ग्राहक हा बाजारव्यवस्थेचा केंद्रबिंदू असून प्रत्येकाने आपले ग्राहक हक्क आणि कर्तव्ये जाणून घेणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. आजच्या डिजिटल व्यवहारांच्या युगात ऑनलाइन खरेदी करताना सावधगिरी बाळगणे, वस्तू खरेदी करताना बिल घेणे तसेच दर्जेदार आणि प्रमाणित वस्तूंची निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. जागरूक ग्राहक बनल्यास समाजात फसवणूक आणि गैरव्यवहार कमी होण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मुख्याध्यापक डी. के. पाटील यांनी यावर्षीच्या “सुरक्षित उत्पादने व आत्मविश्वासू ग्राहक” या आशयसूत्रावर आधारित मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना ग्राहक हक्कांविषयी सविस्तर माहिती दिली. ग्राहक म्हणून प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहणे आवश्यक असून खरेदी करताना बिल घेणे, वस्तूची गुणवत्ता तपासणे तसेच फसवणूक झाल्यास ग्राहक संरक्षण कायद्याचा आधार घेऊन तक्रार करता येते, असे त्यांनी सांगितले. जागरूक ग्राहकच समाजाला योग्य दिशा देऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी वाय. जे. कुरकुरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. सपकाळे यांनी केले. कार्यक्रमास निलेश देशमुख, एस. बी. सपकाळे, वाय. जे. कुरकुरे, क्रीडा शिक्षक जे. ए. चौधरी, सौ. नयना ज्ञानेश्वर पाटील, के. एम. पाटील, एस पी पाटील ,सौ. योगिता संजय झोपे, सौ. महेश्वरी महेश झोपे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र जळगाव जिल्हा संघटक मिलिंद मांडळकर यांनी या कार्यक्रमासाठी सहकार्य व प्रेरणा दिली .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.