--- शिंदी येथे प्रथमच इफ्तार पार्टीचे आयोजन
-- सामाजिक ऐक्य व सलोख्याचा दिला संदेश
शिंदी, ता.भुसावळ - मानवतेचा व शांतीचा मार्ग प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी दाखवलेला आहे. साकृत्य करणाऱ्यांवर परमेश्वर नेहमी प्रेम करतो अशी शिकवण पवित्र कुराण देते असे येथील सईद नथू पिंजारी( मा. ग्रा.पं. सदस्य) यांनी सांगितले.
रमजान निमित्त येथे युनुसशहा सरोवरशहा( ग्रा.पं.सदस्य )व माध्य. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गिरीश नेमाडे यांच्या माध्यमातून प्रथमच नुरानी मस्जिद शिंदी येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
उपस्थित सर्व धर्मीय बांधवांना सईद नथू पिंजारी (मा. ग्रा.पं. सदस्य) यांनी संबोधित केले .रमजान हा पवित्र महिना असून संयम, त्याग, शिस्त आणि मानवतेचा संदेश देणारा महिना आहे .गरीब आणि गरजूंची मदत करणे, जकात देणे आणि सामाजिक सलोखा जपणे यावर विशेष भर दिला जातो असे सांगितले. समाजात बंधुभाव , ऐक्य, भाईचारा वाढते असे सांगितले. यावेळी बोलताना पोलीस पाटील अतुल पाटील यांनी सांगितले की, गावात रमजान महिन्यात इफ्तार पार्टीचे आयोजन प्रथमच होत आहे याचा आनंद सर्व धर्मीय बांधवांना होत आहे. सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वधर्मीय समाजातील मान्यवरांनी उपस्थित राहून सामाजिक ऐक्य व सलोख्याचे दर्शन यावेळी घडविल्याचा आनंद या इफ्तार पार्टी निमित्त व्यक्त करण्यात आला.
हिंदू मुस्लिम ऐक्य, सलोखा ,सामाजिक उपक्रम यावर युनूसशहा सरोवर शहा ( ग्रा.पं. सदस्य )यांनी भाष्य केले.
यावेळी मौलाना युसुफ शहा , हसन बुढन दरवेशी, नशीरशहा गुलाब शहा, अन्सारशहा नजीरशहा, चांद शहा नादरशहा, दिलावरशहा इमामशहा, नबी सिकंदर पिंजारी, पोलीस पाटील अतुल पाटील, सरपंचपती तथा सामाजिक कार्यकर्ते संदीप सपकाळे, माजी सरपंच संतोष गायकवाड( भिल्ल), माजी उपसरपंच भीमराव तायडे, मा. ग्रा.पं. सदस्य दिलीप कोल्हे, मा. विकास सदस्य देविदास गाढेकर( पाटील), ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कोळी, अर्जुन धांडे, राष्ट्रवादी अजित पवार गट युवा तालुकाध्यक्ष जगदीश पाटील, विकास सोसा. कर्मचारी दिपक अडवकर, नरेंद्र( बाळू )धांडे, विद्याधर नेहेते ,अनिल कोल्हे व सर्व धर्मीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. असे कार्यक्रम सामाजिक एकोपा निर्माण करतात असा सूर यावेळी व्यक्त करण्यात आला.