या संस्थेचे महिला अध्यक्ष उर्मिला चौधरी व जळगाव जिल्हाध्यक्ष डॉक्टर भरत महाजन तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेवक यांच्या मातोश्री पूजा राजूभाऊ सूर्यवंशी या उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुजाता साळी व सपना वाघ यांनी केले ज्या महिला आपल्या पतीला स्वबळावर उभे राहून संसारात हातभार लावला व लावत आहे अशा सन्माननीय महिलांना तसेच सुसंस्कृत लहान मुलींचे देशभक्त होऊन गेलेल्या महिलांवर सुंदर असे देखावे आणि भाषणे सादर करण्यात आले त्यांना प्रोत्साहन पर वसुंधरा समृद्धी संस्थे मार्फत सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .
ज्या लहान मुलींनी सुंदर असेल वेशभूषा करून सावित्रीबाई फुले , अहिल्याबाई होळकर , मॉसाहेब जिजाऊ , सिंधुताई सपकाळ , कल्पना चावला , झाशीची राणी लक्ष्मीबाई , सुनीता विल्यम , माता रमाई या भूमिका साकारल्या त्यात सावित्रीबाई फुले यांचा रोल तृप्ती रितेश चव्हाण , सुनीता विल्यम रोल गार्गी नितीन कुलकर्णी , झाशीची राणी रोल तेजस्विनी नितीन सोनीच्या, मॉ साहेब जिजाऊ यांचा रोल म निधी दिनेश थेटे, अहिल्याबाई होळकर यांचा रोल लावण्या संतोष दामोदरे , कल्पना चावला यां चा रोल दुर्वा जितेंद्र महाजन , माता रमाई यांचा रोल कनक परदेशी , सिंधुताई सपकाळ यांचा रोल काव्य संदीप जोशी तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा रोल वेदांत दिनेश थेटे यांनी केले या सर्व महिलांना व मुलींना संस्थेमार्फत सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले सन्माननीय पूजा राजूभाऊ सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम छान पार पडला म्हणून आमचे मंडळ वसुंधरा समृद्धी फाउंडेशन त्यांचे आभार व्यक्त करते तसेच या परिसरात परिसरातील सर्व महिला व बालगोपाल सर्व पुरुष मंडळी व महिला वर्ग या संस्थेचे आभार व्यक्त करते ज्येष्ठ नागरिक म्हणून एम बी महाजन काका यांना गौरवण्यात आले .
या कार्यक्रमात एम बी महाजन नितीन सोनीच्या अविनाश साळी नितीन कुलकर्णी सुरेश कुलकर्णी राहुल महाजन प्रकाश भाऊ करसाळे हरी भाऊ चौधरी विक्रम माळी संदीप जोशी राजेश ठाकूर विजय सोनवणे विनोद वाघ , सी डब्लू पाटील रितेश चव्हाण व इतर पुरुष व महिला व बालवर्ग उपस्थित होते या या संस्थेने पहिल्यांदाच सुंदर असा कार्यक्रम पार पाडला यापुढेही त्यांनी असेच कार्यक्रम घेऊन महिलांना व लहान बालगोपाल यांना सुसंस्कृत करावे व स्त्री जातीचा कसा आदर होईल असे त्यांनी वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत अशी आमची सर्वांची इच्छा आहे या संस्थेचे आम्ही सर्व महिला मंडळ व पुरुष मंडळ आभार व्यक्त करीत आहोत .