Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


भुसावळ येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात होळी उत्सव साजरा

रामेश्वर महादेव मंदिर परीसरात  होळी उत्सव उत्साहात

भुसावळ : शहरातील रामेश्वर महादेव मंदिर येथे श्रीराम हौसिंग सोसायटीच्या वतीने होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. समाजातील एकता, सलोखा व सांस्कृतिक परंपरा जपण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
उत्सवानिमित्त मंदिर परिसर स्वच्छतेसाठी पुरुष सदस्यांनी पुढाकार घेतला. 
श्रीकृष्ण राणे, जयंता पाटील, दिनेश महाजन, किरण पाटील, प्रकाश महाजन, निलेश कोल्हटकर, विजय चौधरी, अरुण येवले, रोहित पाटील, चंद्रकांत येवले, दिनकर कानडे, अनिल लोखंडे, सतीश नेहते व सुधीर बोंडे यांनी एरंड वनस्पतीचे झाड शोधुन आणले . वृक्षांची जिर्ण पाने तसेच कोरडा लाकूड-फाटा गोळा करून परिसर स्वच्छ केला.
उत्सवाच्या निमित्ताने श्रीकृष्ण राणे यांनी भक्त प्रल्हादाची कथा विशद करून होळी सणामागील धार्मिक महत्त्व उपस्थितांना समजावून सांगितले. सत्य, श्रद्धा व भक्तीचा विजय आणि अहंकाराचा पराभव हा होळी सणाचा मुख्य संदेश असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या कथनामुळे वातावरण अधिक भक्तिमय झाले.
सायंकाळी आरतीनंतर महिला भगिनींनी आकर्षक सजावट केलेल्या होळीला वैशाली राणे, सोनल राणे ' दर्शना पाटील व मृणाली पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. दीप्ती कोल्हटकर यांनी पूजाविधीत सहभाग घेतला. निलेश कोल्हटकर व दीप्ती कोल्हटकर यांना सपत्नीक पूजा मान मिळाला . कु . सोनल हस्ते श्रीगणेश पूजन पार पडले.
प्रसाद म्हणून खान्देशची विशेष गुळाची युरणपोळी, कणकेचे पाच दिवे, विविध फुले व श्रीफळ अर्पण करण्यात आले. बालगोपाळांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली. यावेळी हेलिका मातेस पारंपरिक घोषणा देत जयघोष करण्यात आला.
महिला व पुरुषांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे होळी उत्सव भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.