Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Advertisement


मुक्ताईनगर येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनेच्या महामेळावा संपन्न

मुक्ताईनगर येथे विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा संपन्न...

मुक्ताईनगर प्रतिनिधी!
       
        दि. २८ रोजी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव, तालुका विधी सेवा समिती मुक्ताईनगर आणि तालुका वकील संघ मुक्ताईनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जयस्वाल लॉन्स, भुसावळ रोड, मुक्ताईनगर येथे विधी सेवा महा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला.  
       या विधी सेवा महाशिबिराचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव श्री. एम. क्यू. एस. एम. शेख यांचे शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास  जिल्हा न्यायाधीश १ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश भुसावळ श्री. सुनील टी.सुर, श्री. पी. एच. बनसोड सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगाव, प्रांत अधिकारी श्री.जितेंद्र पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अनिल बडगुजर, प्रमुख पाहुणे होते. तसेच मुक्ताईनगर येथील न्यायालयाचे न्यायाधीश श्री. बी.जी.पवार, मुक्ताईनगर तालुका वकील संघाचे अध्यक्ष श्री. ए.आर.कांडेलकर हे विचार मंचावर उपस्थित होते.  
         दि.२८/०२/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सदर कार्यक्रमास मोठ्या जल्लोषात सुरुवात करण्यात आली. ढोल,ताशे व तुतारीच्या निनादात प्रमुख पाहुणे व सत्कारमूर्ती यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर मान्यवरांचा स्वागत, सत्कार व भाषणे झाली.
       या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कारमूर्ती माननीय श्री.एम.क्यू.एस.एम.शेख यांनी विधी सेवा शिबिराचे प्रयोजन आणि विधी सेवा शिबिरांमार्फत जनजागृती व फायदे यावर यावर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. यावेळी मान्यवर श्री. एम.क्यू.एस.एम.शेख व श्री. एस.टी. सुर व संबंधित विभागाचे अधिकारी यांचेकडून तालुक्यातील विविध विभागांमार्फत दिल्या जाणाऱ्या योजना, सेवांविषयीचे प्रमाणपत्र यावेळी मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. 
         यामध्ये मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी अभिजीत शिंदे व विभागातर्फे मान्यवरांच्या हस्ते लाभार्थी चंद्रशेखर रामभाऊ वराडे यांना नैसर्गिक शेती विषयी प्रमाणपत्र देण्यात आले, भारत सुधाकर खोसे यांना मळा काढणी थ्रेशरचे वितरण करण्यात आले, विनायक सुधाकर खोसे, भूषण अशोक बर्हाटे, सचिन पंढरीनाथ पाटील, बंडू माधव पाटील, वैभव विलास राणे यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. सुनील विश्वनाथ गवते यांना दालमिल प्रमाणपत्र, सुनील नारायण डाके यांना चाफ कटर, वितरित करण्यात आले. 
     पी.एम.सोनी योजना नगरपंचायत मुक्ताईनगर या योजनेमार्फत नगरपंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उदासे व मान्यवरांच्या हस्ते शुभम अशोक तळेले, नामदेव पुंडलिक भाकरे, प्रथमेश रमेश मराठे, शेख अनिस शेख हमीद, यांना लाभार्थी प्रमाणपत्र, अनिल सुधाकर तळेले, आशा अंबादास माळी, यांना घरकुल लाभार्थी प्रमाणपत्र, मुकेश राजू बोदडे, नितीन सुधाकर कुलकर्णी, यांना दिव्यांग प्रमाणपत्र, यावेळी देण्यात आले. 
        पंचायत समिती कार्यालय मुक्ताईनगर गटविकास अधिकारी आर. बी. सपकाळे यांचे तर्फे मान्यवरांच्या हस्ते संध्या रवींद्र वाघ, सुनीता विजय जाधव, यांना ५ टक्के दिव्यांग जि.प. स्तर योजना पूर्वसंमती दिलेले अर्जदार यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
       तहसील कार्यालय मुक्ताईनगर तर्फे तहसीलदार गिरीश वखारे व मान्यवरांच्या हस्ते कुसुम सिताराम इंगळे, शंकर नारायण चौधरी, इगबाल खान रशीद खान, इलियास खान रऊफ खान, भागवत सीताराम नाफडे, चंद्रभागा तुकाराम नाफडे, यांना श्रावण बाळ योजना लाभार्थी प्रमाणपत्र यावेळी वाटप करण्यात आले.
      तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी  परिमल साळुंखे, वनपाल दिपाली जाधव व मान्यवरांच्या हस्ते वन्य प्राण्यांमुळे झालेल्या शेती नुकसान भरपाई करिता रमेश मारुती पाटील, अनिल नारायण शेळके, ध्यानसिंग चांभार कुसवे यांना वन्य प्राण्यांमुळे शेतीपिक नुकसान भरपाई रक्कम त्यांचे खातेत जमा झाल्याचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
       कार्यक्रम स्थळी तालुका विधी सेवा समिती मुक्ताईनगर,  तालुका कृषी अधिकारी कार्यालय, पी.एम. सोनी योजना, नगरपंचायत कार्यालय, नगरपंचायत दिव्यांग विभाग, पंचायत समिती कार्यालय मुक्ताईनगर, तहसील कार्यालय मुक्ताईनगर, कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर, वनपरिक्षेत्र अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांचेमार्फत विविध योजनांचा लाभ व त्याविषयी माहिती देणारे स्टॉल लावण्यात आलेले होते. 
       या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील सन्माननीय न्यायाधीश, वकील मंडळी, कोर्ट अधिकारी व कर्मचारी, पोलीस निरीक्षक व पोलीस अधिकारी व कर्मचारी, तहसीलदार व तहसील अधिकारी व कर्मचारी,  मुक्ताईनगर तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी नगरपंचायत मुक्ताईनगर, विविध बँकांतील अधिकारी, मुक्ताईनगर शहरातील महाविद्यालये व शाळांतील प्राचार्य व मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारी, मुक्ताईनगर तालुक्यातील पोलीस पाटील, आशा सेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होते. 
        या कार्यक्रमासाठी स्वागत गीत व लेझीम कलाकृती डॉ. जगदीश पाटील स्कूल व आदर्श इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.  सदर कार्यक्रमास रांगोळी व सजावट ही कोर्ट कर्मचारी विलास जावळे व नंदा गवळी यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जळगाव येथील न्यायाधीश साक्षी खरे,  न्यायाधीश एम. व्ही. मोरे, व मुक्ताईनगर येथील ॲड.संतोष टी. कोळी यांनी केले. तसेच आभार मुक्ताईनगर न्यायालयाचे न्यायाधीश श्री. बी.जी.पवार यांनी व्यक्त केले.
        या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुक्ताईनगर तालुका वकील संघातर्फे  ॲड. संतोषकुमार टावरी, तुषार पटेल, संतोष कुमार कलंत्री, पी.एल.पाटील, प्रवीण भोंबे, संतोष इंगळे, अरुण कांडेलकर, ललित पुजारी, विनोद इंगळे, देविदास काळे, अरविंद गोसावी, सहदेव तायडे, श्रीकृष्ण दुट्टे, देविदास काळे, रमेश हागे, उमेश जवरे, कुणाल गवई, संतोष कोळी, राहुल लहासे, राहुल पाटील, उल्हास पाटील, अशोक बोदडे, देवेंद्र बोदडे, धीरज पानपाटील, जगदीश निकम, शैलेश वानखेडे, सचिन सुरवाडे, नीरज पाटील, भीमराव बांगर, रुपेश वानखेडे, आकाश इंगळे, सुजाता इंगळे, प्रफुल्ल मेढे यांनी मेहनत घेतली. 
     तसेच मुक्ताईनगर तालुका विधी सेवा समिती, व मुक्ताईनगर न्यायालयाचे वतीने सहाय्यक अधीक्षक किशोर एस. पिंगाणे, जी.आर.सावळे, एन.आर. राजहंस, एस. बी. बाविस्कर, महेंद्र शिंदे, कुणाल वाघ, किशोर भारुळे, विजय बारी, सुनील पाटील, ए. टी. कोळी, राहुल चव्हाण, अख्तर शेख, यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.
       तसेच या कार्यक्रमासाठी जळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे जे. ओ. माळी, आर के पाटील, पी. बी. ठाकरे यांनी सहकार्य केले. मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ, प्रादेशिक परिवहन मोटर वाहन विभाग चे निरीक्षक सौ.भाग्यश्री पाटील, सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक राहुल काळे व पुरुषोत्तम शेवाळे, कृषी महाविद्यालय मुक्ताईनगरचे प्राचार्य संदीप पाटील कृषी महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यावेळी यांची स्टॉल सह उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.