डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान मंडळाच्या वतीने विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक वाय. जे. कुरकुरे होते. विज्ञान शिक्षक एन. बी. चौधरी यांनी या वर्षासाठी विकसित भारतासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या थीमचे प्रास्ताविकात सादर करून विज्ञान दिनाचे महत्त्व स्पष्ट केले. इयत्ता ७ वी ‘ब’ मधील कु. मयुरी राहुल कोळी हिने विज्ञान दिनाचे महत्त्व प्रभावी शब्दांत विशद केले.
अध्यक्षांचे मनोगत
अध्यक्षीय भाषणात वाय. जे. कुरकुरे यांनी सांगितले की, विज्ञान म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील ज्ञान नसून विचार करण्याची सवय आहे. “का?” आणि “कसे?” हे प्रश्न विचारल्यानेच शोध लागतात. विद्यार्थ्यांनी जिज्ञासा जपावी, प्रयोगशील वृत्ती अंगीकारावी आणि अंधश्रद्धेपेक्षा वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
ते पुढे म्हणाले की, आजचा विद्यार्थीच उद्याचा शास्त्रज्ञ, अभियंता आणि संशोधक आहे. अपयश हेच यशाचे पहिले पाऊल असून चिकाटी, परिश्रम आणि सकारात्मक विचार यांमुळेच मोठी उद्दिष्टे साध्य होतात. “विज्ञान हीच राष्ट्राच्या प्रगतीची खरी दिशा आहे,” असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी व्यक्त केले.
कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांनी समर्पक व आकर्षक फलक लेखन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
यावेळी के. पी. चौधरी, जे. चौधरी, पी. सी. कचरे, एन. बी. चौधरी, सौ. नयना ज्ञानेश्वर पाटील, एस. बी. सपकाळे, के. एम. पाटील , एन ए देशमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी बांधव जेष्ठ लिपिक आर ऐ चौधरी , कनिष्ठ लिपिक रामभाऊ वानखेडे , संजय झोपे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एन. बी. चौधरी यांनी केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.