जिल्हा शल्यचिकित्सकांकडे कलीम शेख यांनी केलेल्या तक्रारीला मिळाले यश.... दस्तुरखुद्द जिल्हा शल्य चिकित्सक मलकापुरात दिव्यांग बोर्डात स्वत: हजर
मलकापुर:- उप जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग तपासणी बोर्डातील विविध समस्याबाबत तसेच तपासणी बोर्डातील तज्ञ डॉक्टरांच्या मनमानी कारभाराबाबत अपंग जनता दल संघटनेचे राज्य सचीव कलीम शेख यांनी डॉ.दत्तात्रय बिराजदार जिल्हा शल्य चिकीत्सक सामान्य रुग्णालय बुलडाणा यांना निवेदन वजा तक्रार दाखल केली असता, सदर तक्रारीचे अनुषंगाने आज दि.12 फेब्रुवारी बुधवार रोजी जिल्हा शल्य चिकीत्सक यांनी दखल घेत उप जिल्हा रुग्णालयाची दिव्यांग तपासणी बोर्डात प्रत्यक्ष भेट देऊन उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ.राजेश उंबरकर,नेत्रतज्ञ डॉ.निरज क्षिरसागर, डॉ.लांजुळकर यांची झाडाझडती घेत भेट दिली तब्बल तीन तास प्रत्यक्ष हजर राहून कलीम शेख यांचे निवेदनातील नमुद तक्रारीची तसेच दिव्यांगाची प्रत्यक्ष भौतीक पडताळणी करून तपासणी करणा-या तज्ञ डॉक्टरांप्रती त्रीव नाराजी व्यक्त करुन यापुढे दिव्यांगाप्रती सहानुभुतीपुर्वक भावना ठेवुन तपासणी करण्याच्या सुचना दिल्या दिव्यांगाचे प्रश्न मार्गी लागल्याने संघटनेचे सर्व दिव्यांगानी जिल्हा शल्य चिकीत्सक बिराजदार यांचा सत्कार करून आभार व्यक्त करीत तसेच दिव्यांगरुपी आर्शीवाद दिले.