*
अहिल्यानगर दिव्यांग उपाध्यक्षपदी महावीर सिंग चव्हाण यांची निवड
सतीश पाटील भडगाव तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी गीतकार कवी शाहीर प्राध्यापक डॉक्टर महावीर सिंग चौहान गोंडगावकर यांची अहिल्यानगर जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले
महाराष्ट्र राज्याच्यागीतकार कवी, शाहीर, प्राध्यापक डॉ. महावीर सिंग चौहान यांची निवड झाल्याची घोषणा राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष श्री संदीप कुमार बोरकर यांनी केली आहे . प्राध्यापक महावीर सिंग चव्हाण हे गोंडगाव तालुका भडगाव जिल्हा जळगावयेथील सपुत्र असून अहिल्यानगरच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉ. महावीर सिंग चौहान गोंडगावकर यांनी सांगितले की निश्चितच मी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरती दिव्यांग निराधार आणि गोरगरीब लोक कलावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीन. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात भल्या पहाटेच्या लोक कलावंत पिंगळ्यापासून , देवीचे जागरण गोंधळ घालणारे गोंधळी, टिंगरीवाले भराडी, पोतराज, भारुडकार, नकलाकार, शाहीर, असे अनेक लोक कलाकार आपल्या कलांपासून वंचित राहिलेले आहेत त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली आहे अशा वेळेस त्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावरती एक व्यासपीठ देण्याचे दृष्टीने व त्यांची सामाजिक ,आर्थिक ,राजकीय पाठराखण करण्यासाठी राष्ट्रीय लोक कलावंत दिव्यांग निराधार संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य व त्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री संदीप कुमार जगदीश बोरकर यांनी माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे ती मी निश्चितच पूर्ण करीन त्याबद्दल मी श्री बोरकर यांचा आभारी आहे व निश्चितच लोक कलावंतांना मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन
प्राध्यापक डॉ. महावीर सिंग चौहान यांच्या या निवडीबद्दल पत्रकार सतीश पाटील गोंडगाव तालुका भडगाव येथील ग्रामस्थ मित्रमंडळीसर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे