डी. एस.देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय थोरगव्हाण तालुका रावेर येथे भव्य माजी विद्यार्थी मेळावा २ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी विद्यार्थी तथा सेवानिवृत्त क्रीडा शिक्षक श्री एम आर पाटील सर कार्यक्रमाची सुरुवात थोर समाज शिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्या पूजनाने व दीप प्रज्वलाने करण्यात आली त्याप्रसंगी संस्था अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, माजी मुख्याध्यापक ए व्ही पाटील सर, सेवा निवृत्त सीनियर क्लर्क श्री ए पी पाटील, माजी विद्यार्थी श्री सुकलाल धनगर ,माजी विद्यार्थी श्री बाऊस्कर
साहेब, माजी विद्यार्थी एकनाथ बळवंत पाटील, माजी शिक्षक पी एम शिर्के सर ,माजी विद्यार्थी उपसरपंच नितीन चौधरी, माजी विद्यार्थी जनार्दन कोळी, माजी शिक्षक श्री वाय एम बोरोले सर,माजी विद्यार्थिनी सौ मीनाताई चौधरी श्रीमती सिंधूताई पाटील बऱ्याच भगिनी देखील उपस्थित होत्या.दि एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष श्री उमाकांत बाऊस्कर,सचिव श्री पवन चौधरी, संचालक तथा शालेय समिती सदस्य श्री नंदकुमार चौधरी, संचालक श्री रवींद्र काशिनाथ चौधरी, यांनी संचालक श्री चंद्रकांत सुराजी पाटील, संचालक श्री मधुकर वसंत कोल्हे, संचालक श्री राजेंद्र देशमुख सर, संचालक श्री कमलाकर चौधरी सर, संचालक श्री एस एच चौधरी सर, संचालक श्री प्रकाश बाऊस्कर तसेच ग्राम पंचक्रोशीतून आलेले माजी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करण्यात आली त्यासाठी श्री के एम पाटील व श्री एन बी चौधरी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री डी के पाटील सर यांनी केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री एम आर पाटील सर यांनी चार समाज धुरीनांनी त्यावेळेस लावलेलं हे छोटे शाळेच रोपट म्हणजे असंख्य विद्यार्थी जीवनाला आकार देणारे सरस्वती चे मंदिर स्थापन करून त्यांच्या जीवनात प्रगतीचा उजेड आणला अशा या दूरदृष्टी असलेल्या समाज धुरिणांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यांच्या कार्याचा बहुमान केला गेला .आलेल्या बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गतकाळातील आठवणी जाग्या केल्या व आज आपली जी उत्तम प्रगती झालेली आहे,त्यामध्ये शाळेचा सिंहाचा वाटा असल्याचे मान्य केले व आज आपल्याला शाळेच्या वैभवशाली वाटचालीसाठी सहकार्य व मदत करण्याची गरज असल्याचे सांगितले, सर्वात वयोवृद्ध माजी विद्यार्थी श्री एकनाथ बळवंत पाटील यांनी सर्वांना शाळेच्या भल्यासाठी आवाहन केले व स्वतः 25 हजार रुपयाची मदत केली .त्यातून बहुसंख्य माजी विद्यार्थ्यांनी आपली आर्थिक स्वरूपातील मदत घोषित केली व भविष्यात देखील आम्ही निश्चित मदत करत राहू व इतरांना देखील मदत करण्यासाठी प्रवृत्त करू असे आश्वासन दिले संस्थाध्यक्ष चंद्रकांत दादा चौधरी यांनी आमच्यावरती विश्वास ठेवा आम्ही निश्चित तुमच्या विश्वासाला द्विगुणित करू सर्व शाळेच्या भल्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तन-मन-धनाने कार्य करण्याचे आश्वासन सर्वांना दिले. माजी मुख्याध्यापक ए व्ही पाटील यांनी प्रामाणिकपणा व मेहनत, जिद्द चिकाटी याच्या जोरावरती समाज शिक्षकाला डोक्यावर घेतो व भरभरून प्रेम देतो त्यामुळे विद्यार्थी हे दैवत मानून एकमेकांच्या विचाराचे आदान प्रदान करून जर कार्य केले तर ते निश्चित फलदायी होते असा आशावाद व्यक्त केला. याप्रसंगी असंख्य माजी विद्यार्थी खूप भावुक झाले होते त्यांनी आपले अश्रू अनावर केले व शाळा जगली पाहिजे, टिकली पाहिजे यासाठी सर्वांनी एक दिलाने एकमताने आपण उभे राहूया व समाजातील गरीब वंचित घटकांना शिक्षणाची ही गंगा सदैव खुली राहू देऊ हे कळकळीचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी आलेल्या सर्व मान्यवरांचा पुष्पगुच्छ व गुलाब पुष्प देऊन मनोभावे आदरातिथ्या केल गेले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एम के पाटील व श्री वाय जे कुरकुर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक श्री डी के पाटील यांनी मानले व वंदे मातरम या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर सर्वांना संस्थेच्या सन्माननीय सदस्यांनी स्नेहभोजन दिले. कार्यक्रमासाठी शाळेचे समस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवृंद उपस्थित होते.