कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुक्ताईनगर तालुक्याचे माननीय आमदार चंद्रकांत पाटील हे येणार होते परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ते येऊ शकले नाही ,परंतु त्यांच्या कार्यकर्ते श्री नितीन चौधरी व उमेश कोल्हे शिवसेना शाखाध्यक्ष श्री पंकज पाटील व गावातील बहुसंख्या नागरिक पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष श्री चंद्रकांत कोल्हे व सदस्य हे उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री पवन दादा चौधरी ,शालेय समिती सदस्य श्री नंदकुमार चौधरी,संचालक श्री चंद्रकांत सुराजी पाटील, संचालक श्री रवींद्र काशिनाथ चौधरी हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावच्या प्रथम नागरिक सरपंच श्रीमती रेखा तायडे व अध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी व मुख्याध्यापक डी के पाटील यांनी सरस्वती पूजन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आवश्यकत्या सूचना व विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठीच्या उपयुक्त बाबी, शंका निरसन तसेच विद्यार्थी व पालक यांच्याकडून कॉपीमुक्त अभियानाची शपथ मुख्याध्यापक श्री डी के पाटील मुख्याध्यापक घेतली. ज्येष्ठ संचालक श्री रवींद्र काशिनाथ चौधरी यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष श्री चंद्रकांत चौधरी यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून विद्यार्थ्यांना तुम्ही समाजाचे पालकांचे व शाळेचे तुमच्या उत्तम कार्यातून नाव मोठे करावे असा सल्ला दिला.तसेच उपसरपंच श्री नितीन चौधरी व श्री उमेश कोल्हे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी रायटिंग पॅड्स भेट स्वरूपात उपलब्ध करून दिल्या तसेच समस्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी इयत्ता दहावी बारावीचे विद्यार्थ्यांसाठी व उपस्थितांसाठी ग्रामपंचायत सदस्या सौ हेमलता बाऊस्कर व श्री रमेश कडू बाऊस्कर यांनी स्नेहभोजन उपलब्ध करून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री वाय जे कुरकुरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी माजी सरपंच सतीश चौधरी ,माजी उपसरपंच श्री धीरज पाटील इतरही ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व पालक बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी मेहनतीने कार्यक्रम यशस्वी केला.